Wedding Tips: लग्नाआधी मुलींसाठी करण्यात येणा-या 'Spinster party' साठी 10 भन्नाट आयडियाज
Spinster Party (Photo Credits: File)

Spinster Party Ideas: बदलत्या काळानुसार आता लग्न म्हणजे विवाह पद्धती, परंपरा, रिती एवढ्या पुरता मर्यादित न राहता त्यात अनेक नवनवीन पद्धती समाविष्ट होत चालल्या आहेत. त्या प्री वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग, फोटोशूट, मेहंदीचा कार्यक्रम असे अनेक प्रकार दिवसेंदिवस रुजू लागले आहेत. यात एक नवीन प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतातही रुढ होत चाललाय तो म्हणजे लग्न होणा-या आपल्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून Bachelor Party करणे. यात मुलांच्या पार्टीला Bachelor Party तर मुलींच्या पार्टीला Spinster Party असे नाव पडले. लग्न होणा-या आपल्या बॅचलर मित्र-मैत्रिणीसोबत वेळ घालवून छान धमाल, मस्ती करणे हा या मागचा उद्देश असतो. कारण कदाचित लग्नानंतर त्या मित्राचे नवीन आयुष्य सुरु होईल आणि मग त्याला आपल्याला भेटायला सुद्धा वेळं मिळणार नाही या विचाराने त्याच्याकडून गंमतीचा भाग म्हणून ही पार्टी आयोजित केली जाते.

यात मुलींची Spinster Party ही सुद्धा आजकाल विशेष बनत चालली आहे. मुली मुलांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात कमी नाही तितक्याच त्या Spinster Party करण्यात सुद्धा कमी नाही. या स्पिंस्टर पार्टीची रौनक वाढविण्यासाठी '10' भन्नाट आयडियाज:

1) पार्टीसाठी नववधूला Bride to be, Crown, goggles यांसारखे अनेक वस्तू घेऊ शकता. हे तुम्ही गिफ्ट्सच्या दुकानात किंवा ऑनलाईनही ऑर्डर करु शकता.

2) खट्याळ किंवा अश्लील कोडींचा(Puzzle) चा खेळ खेळू शकता.

3) नववधूसाठी Customize पण थोडा अंतरंगी केक बनवून आणू शकता

4) लवकरच लग्नबंधनात अडकणा-या मैत्रिणीला सेक्ससाठीच्या काही टिप्स देऊ शकता.

हेदेखील वाचा- Wedding Invitation Cards Ideas: लग्नपत्रिकांना डिजिटल टच देऊन व्यंगचित्राच्या माध्यमातून तयार केलेल्या पत्रिकांच्या अफलातून आयडियाज, नक्की पाहा

5) Drink If- हा सुद्धा एक इंटरेस्टिंग खेळ आहे. यात तुम्ही Drink, cold Drink चे ग्लास हातात घेऊन सर्वांना एक एक गोष्ट विचारायची जी खूपच विचित्र किंवा थोडक्यात एकमेकांशी शेअर केली नसेल ज्यांनी ती गोष्ट केली आहे त्यांनी ग्लासमधील 1 Sip घ्यायचा.

6) तुम्ही तुमच्या नववधू मैत्रिणीला किती ओळखता हे पाहण्यासाठी एखादा प्रश्नोत्तरांचा खेळ खेळू शकता.

7) Dirty Talk

बॅचलर मुलींसाठी ही आयती संधी चालून आल्यामुळे त्या एकत्र येऊन अनेक डर्टी टॉक्स करु शकता. हे काय असतील हे आम्ही न सांगितलेलेच बरे नाही का? त्यामुळे ज्याचे त्याने ठरवावे.

हेदेखील वाचा- Wedding Special Ukhane For Bride: नव्या नवरीने घ्यायचे 'हे' हटके उखाणे लग्न सोहळ्यातील विधींसाठी आहेत बेस्ट पर्याय

8) शाळा, कॉलेज, ऑफिसच्या जुन्या आठवणी, आपले एक्स बॉयफ्रेंड्स बदल किस्से रंगवू शकता. ते ऐकण्यात ही खूप मजा असते.

9) आपल्या मैत्रिणींनी या आधीही कधीही एखादी गोष्ट केली नसेल ती करायला सांगू शकता किंवा गंमत म्हणून तिचे एखादं सिक्रेट बाहेर काढू शकता.

10) सर्वात शेवटी पण मुलींसाठी खूप महत्त्वाचे डान्स. अंतरंगी गाण्यांवर बेभान होऊ नाचा. असा नाच जो तुम्ही या आधी कधीही केला नसेल.

थोडक्यात Spinster Party ही विशेष करुन या आधी कधीही केली नसेल अशी गोष्ट करण्यासाठी असते. वरील बरेच गेम्स ही बोलण्याचे असल्यामुळे आणि बडबड करणे हा मुलींचा आवडता छंद असल्यामुळे त्या नक्कीच हे खेळ एन्जॉय करतील.