Vitamin C युक्त फळे खा! शरीरातील वजन आणि चरबी कमी करा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

नियमितपणे फळांचे सेवन केल्यास आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. तर फळं खाल्ल्याने पाचनक्रियासुद्धा सुरळीत चालू राहण्यास मदत होते. त्यामुळे विटामीन सी असलेल्या फळांचे सेवन केल्यास या थंडीच्या दिवसात तुम्हाला पोटाचे आणि आजारी पडण्याच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईस.

तर जाणून घ्या कशा पद्धतीने विटामिन सी (Vitamin C) असलेली फळे शरीरातील वजन (Weight) आणि चरबी (Fats) कमी करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात.

-संत्र्याचा ज्यूस प्या, फळ खाऊ नका.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संत्र्याचे फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी उत्तम. तर एक ग्लास भर ज्यूसमध्ये संत्र्यामधील कॅलरीची संख्या दुप्पटीने वाढते. त्यामुळे नियमित ज्यूस प्यायलाने वर्षभरात तुम्ही १९ हजार कॅलरी वाचवू शकता.

-वजन कमी करण्यासाठी द्राक्ष

द्राक्षांमध्ये विटामिन सोबत फायबरची गुणवत्ता खूप प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी मानले जाते. त्यामुळे आहारामध्ये द्राक्षांच्या विविध प्रकारे उपयोग करुन खाल्ल्यास तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.

-स्नॅकच्या रुपात सफरचंदाचे सेवन करा

भूक लागल्यावर स्नॅक ऐवजी रोज एक सफरचंद खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये विटामीन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

-अॅवकाडोमुळे (Avocado) खा.

अॅवकाडोमुळे Metabolism तंदूरुस्त राहण्यास मदत होते. तर अॅवकाडो या फळामध्ये ओमेगा 9 फॅंटी अॅसिडचे प्रमाण भरपूर असते. शरीरातील चरबीचे ऊर्जेत रुपांतरण होण्यासाठी हे फळ अगदी उपयुक्त मानले जाते. तसेच ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आणि  नट्स (Nuts)सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी असते

- उपयुक्त नारळ

नारळामध्ये विटामिन ए, बी, सी आणि खजिन यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन केल्यास त्याच्या वजनात काही दिवसात फरक जाणवण्यास सुरुवात होईल. तर पाचनशक्ती सुरळीत ठेवण्यासाठी नारळाचा  आरोग्याला फार उपयोग होतो.