साईभक्तांसाठी एक आनंददायी बातमी आहे. देशातल्या 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु झाली आहे. इंडिगोनंतर (Indigo) स्पाईसजेटने (SpiceJet) देखील भोपाळहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु केली आहे. यापूर्वी पाच शहरात स्पाईसजेटची शिर्डी विमानसेवा सुरु होती. आजपासून अहमदाबाद-शिर्डी (Ahmedabad-Shirdi) विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातून साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची चांगली सोय झाली आहे. या विमानसेवेमुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. शिर्डीत एकूण 20 विमानांचे आगमन आणि उड्डाण होणार आहे.
हैद्राबाद, मुंबई, दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळूरु या भागातून ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. तर 10 जानेवारीपासून चेन्नईहुन शिर्डी विमानसेवा सुरु करण्यात येईल.
आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी हैद्राबादसाठी एका विमानाची अतिरिक्त फेरी सुरु करण्यात येणार आहे. तसंच काही महिन्यात शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरविण्याची सुविधा सुरु होईल. कालांतराने विमानांची संख्या वाढवण्यात येईल. साईभक्तांसाठी खूषखबर ! आजपासून नियमित दिल्ली - शिर्डी थेट विमानसेवा सुरू
स्पाइसजेटने सर्व नवीन घोषित मार्गांसाठी 'बॉम्बार्डियर क्यू 400' ही विमाने सेवेत दाखल केली आहेत. ही विमाने विशेषतः व्यावसायिक प्रवाशांसाठी डिझाईन करण्यात आली आहेत.