
शिर्डीच्या साईभक्तांसाठी एक खूषखबर आहे. दिल्लीहून शिर्डी विमानतळादरम्यान थेट विमानसेवा आज 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. अवघ्या काही तासात आरमदायी प्रवास म्हणून विमानप्रवासाकडे पाहिलं जातं. आता काही मिनिटांत साईदर्शनासाठी भाविक पोहचू शकणार आहेत त्यामुळे भाविकांमध्येही चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे.
स्पाईस जेट देणार सुविधा
दिल्ली ते शिर्डी ही थेट विमानसेवा स्पाईस जेट देणार आहे. तसेच ही सेवा नियमित असणार आहे. Boeing 737 विमानाने भाविकांना अवघ्या काही मिनिटांत साईदर्शनासाठी शिर्डीत पोहचणं शक्य होणार आहे. विमानसेवेमुळे शिर्डीतील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सुमारे60,000 भाविक दररोज शिर्डीला साईदर्शनासाठी येतात.
काय असतील विमानाच्या वेळा ?
स्पाईस जेट विमान क्रमांक SG946आज सुपारी दिल्लीहून 12.35 ला उड्डाण करेल. हे विमान 2.35च्या सुमारास शिर्डीमध्ये लॅन्ड करणार आहे. संध्याकाळी 3.05 वाजता शिर्डीहून दिल्लीकडे निघालेलं विमान 4.55 मिनिटांनी लॅन्ड करेल.