द रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल (The Royal Caribbean International), या 49 वर्षीय जागतिक क्रूझ ब्रँडने आपली दोन प्रवासी जहाजे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून आशिया खंडात विविध ठिकाणी सफर घडवतील, अशी घोषणा 2018 मध्ये केली होती. त्यानुसार त्यातील स्पेक्ट्रम ऑफ द सीज (Spectrum of the Seas) हे जहाज आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. यातील दुसरे जहाज, एक्सप्लोरर ऑफ द सीज (Explorer of the Seas) लवकरच मुंबईत दाखल होईल.
‘स्पेक्ट्रम ऑफ द सीज’ हे समुद्रपर्यटनामधील भारतातील सर्वात मोठे जहाज असल्याचा दावा केला जात आहे. सध्या क्वांटम आणि ओव्हेएशन ऑफ द सीज ही दोन जहाजे सर्वात मोठी जहाजे समजली जातात. स्पेक्ट्रमची लांबी 1,139 फुट इतकी असून, यामध्ये एकावेळी 5,622 प्रवासी प्रवास करू शकतात. या जहाजामध्ये स्काय पॅड, व्हर्चुअल रिअॅलिटी, बंजी ट्रॅम्पोलिन, 2,809 चौरस फुटांचा 11 लोकांसाठी असलेला फॅमिली सुट अशा सुविधा आहेत. (हेही वाचा: मुंबई गोवा प्रवास आता आलिशान क्रुझमधून...)
खास आशियायी बाजारासाठी हे जहाज तयार करवून घेतले आहे. या जहाजामध्ये डायनिंगची विशेष सोय केली आहे, ज्यामध्ये तुम्ही जगभरातील विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. रेड हे नवीन स्पेशालिटी रेस्टॉरंट आणि लीफ अँड बीन ही पारंपरिक टी रूम आणि कॅफे पार्लर देखील येथे उपलब्ध आहेत. भारतीय प्रवाशांसाठी सध्या 5 रात्रींसाठी दुबई-मुंबई, 9 रात्रींसाठी मुंबई-सिंगापूर आणि ओमानमधील मस्कत, कोचीन, मलेशियातील पेनांग असे पर्यटनाचे पर्याय उपलब्ध आहेत. आधी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना खास कार्ड की प्रवेश, खासगी एलिव्हेटर आणि आरामासाठी बाहेर जागा अशा विविध सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.