Ro-Ro Ferry: गणेशोत्सवानिमित्त सुरु करण्यात आलेल्या मुंबई ते मांडवा रो-रो फेरीतून प्रवास करण्यासाठी तिकीट बुकींग कसे कराल? जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर
Ro-Ro Ferry (Photo Credits: M2M Ferries)

मुंबई ते मांडवा (Mumbai-Mandwa) दरम्यान रो-रो फेरीची (Ro-Ro Ferry) वाहतुक 20 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल. 15 मार्च पासून रो-रो फेरी सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे सेवेत खंड पडला होता. मात्र पुन्हा सुरु झालेल्या सेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सेवा सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी 100 प्रवाशांचे आणि 30 कार्सचे बुकींग झाले होते. (Ro-Ro Ferry: मुंबई-मांडवा रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरु; ऑनलाईन तिकीट बुकींगची सोय)

रो-रो फेरी तिकीट दर:

रो-रो फेरीचे तिकटी दर 300 रुपये प्रति प्रवासी असे आहेत. या फेरीतून पाळीव प्राण्यासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 रुपये अधिक भरावे लागतील. दोन चाकी वाहनांसाठी 200 रुपये तर सायकलसाठी 100 रुपये असे दर आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या कार्ससाठी तिकीटाचे दर अनुक्रमे 800 रु., 1000 रु. आणि 1200 रु. इतके आहेत.

रो-रो फेरी वेळापत्रकः

खालील वेळापत्रकाप्रमाणे रो-रो फेरी 30 ऑगस्टपर्यंत मुंबई ते मांडवा असा प्रवास करेल. त्यानंतर प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात येतील.

रो-रो फेरीचे तिकीट बुकींग कसे कराल?

रो-रो फेरीचे तिकीट बुकींग करण्यासाठी 8291902662  आणि 9920186261 या क्रमांकावर संपर्क करा. तसंच एम २ एम फेरी सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन बुकींग देखील सुरु करण्यात आले आहे.

एका वेळेस 500 प्रवासी आणि 145 कार्सची क्षमता असलेल्या रो-रो फेरीत सध्या मात्र केवळ 300 आणि 60 प्रवाशांसाठी बुकींग सुरु आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रवासी, क्रु सदस्य आणि इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.