Pragati Express: मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेसमध्ये आता विस्टा डोम कोचचा नव्याने समावेश
भारतीय रेल्वे (File Photo)

पावसाळ्यात मुंबई-पुणे (Mumbai Pune) प्रवास रेल्वे (Railway) मार्गे करणे म्हणजे अस्सलं नयनसुख घेणे होयं. त्यातही जर हा प्रवास विस्टा डोम कोच (Vista Dome Coach) मधून करता आला म्हणजे आनंद काही वेगळाचं! पूर्वी डेक्कन क्वीन (Deccan Queen Express) किंवा जनशताब्दी (Jan Shatabdi Express) या दोन एक्सप्रेसला विस्टा डोम कोच होता पण आता यात आणखी एका एक्सप्रेसची भर पडणार आहे. मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला (Pragati Express) आता व्हिस्टाडोम कोच असणार आहेत. व्हिस्टा डोम कोच असल्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कोव्हिड (Covid) दरम्यान प्रगती एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा ही एक्सप्रेस आजपासून धावणार असुन यात व्हिस्टा डोम कोचचं गिफ्ट रेल्वेने प्रवाशांना दिलं आहे.

 

प्रगती एक्सप्रेस रोज पुण्याहून सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल तर संध्याकाली 4 वाजून 25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याला जाईल. पुणे मुंबई दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी प्रगती एक्सप्रेस हा एक उत्तम पर्याय आहे. प्रगती एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तर यापूर्वी व्हिस्टा डोम असलेल्या चार एक्सप्रेस मुंबई पुणे मार्गावर धावतात. तसेच पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण पुर्वी व्हिस्टा डोम कोचचं तिकिट बुकींग करणे खुप अवघड व्हायचं पण आता प्रगती एक्सप्रेसच्या ,माध्यमातून प्रवाशांना ही नवी सुविधा मिळणार आहे. (हे ही वाचा:- Mumbai Alibag Cruise : आता आशियातील हायस्पीड क्रूझने करा मुंबई अलीबाग प्रवास)

 

प्रगती एक्सप्रेसला असलेला व्हिस्टा डोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या असणार आहेत तर हा कोच पूर्णपणे पारदर्शक आहे. विस्टाडोम कोचचे छतही काचेचे आहे.  पावसाळ्याती प्रवासादरम्यान सह्यांद्रीच्या पर्वतरांतून ढग, आकाशातील तारे आणि बरसणारा पाऊस पर्यटकांना या रेल्वे प्रवासाला जरुर खुणावेल.