India's first solar-powered miniature train | Photo Credits: Twitter/ @TrivandrumL

भारतामधील पहिली सौर उर्जेवर चालणारी मिनिएचर ट्रेन (Solar Energy Driven Miniature Railway) केरळमधील वेली (Veli) गावात सुरू झाली आहे. पर्यटन वाढवण्याच्या अनुषंगाने आणि निसर्साचं विलोभनीय रूप पाहता यावं याकरिता या प्रोजेक्टची सुरूवात करण्यात आली आहे. ही 2.5 किमी मिनिएचर रेल्वे आहे. या प्रोजेक्टची किंमत सुमारे 10 कोटी आहे.

इतर सामान्य ट्रेन प्रमाणेच या मिनिएचर ट्रेनमध्ये देखील सोयी सुविधा आहेत. पर्यटकांना या ट्रेनचा आनंद घेताना बोगदा, स्टेशन आणि तिकीट ऑफिस देखील आहे. या ट्रेनला 3 बोगी आहेत तर एकावेळी 45 प्रवासी एकत्र प्रवास करू शकतात. Matheran Train Service Time Table: माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सुरू; इथे पहा अमन लॉज - माथेरान दरम्यान शटल सेवेचं वेळापत्रक.

भारतातल्या पहिल्या सौर उर्जेवर चालणार्‍या ट्रेनची झलक

भारतातल्या या पहिल्या सौर उर्जेवर चालणार्‍या ट्रेनचं लहान मुलांमध्ये विशेष आकर्षण पहायला मिळत आहे. पण लहान मुलांसोबतच यामध्ये प्रौढ व्यक्ती देखील प्रवास करू शकतात. लवकरच वेली टुरिस्ट व्हिलेज मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने मोठे प्रोजेक्ट्स सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये tourist facilitation centre, कन्व्हेन्शन सेंटर आणि आर्ट कॅफे देखील असेल. लवकरच ते देखील सुरू होतील. कन्व्हेन्शन सेंटर मध्ये आर्ट गॅलेरी, डिजिटल डिस्प्ले फॅसिलिटी असेल त्याच्या द्वारा राज्यातील टुरिझम आणि कल्चरल सेंटरची माहिती करून दिली जाईल. सोबत ओपन एअर थिएटर्स देखील सुरू केले जाणार आहेत.