IRCTC कडून आज लॉन्च होणार भारतातील पहिली Indigenous Luxury Cruise Liner;पहा त्याची खास वैशिष्ट्यं
IRCTC | (Photo Credits: Wikipedia)

IRCTC कडून आज (18 सप्टेंबर) भारतामधील पहिली Indigenous Cruise Liner लॉन्च केली जाणार आहे. Cordelia Cruises या खाजगी कंपनी सोबत त्यांची पार्टनरशीप आहे. दरम्यान IRCTC Web Portal द्वारा त्याचं बुकिंग लवकरच खुलं केले जाणार आहे. देशांतर्गत आणि इंटरनॅशनल अशा दोन टप्प्यांमध्ये ही क्रुझ लायनर प्रवाशांसाठी असणार आहे. मुंबई ते गोवा, दीव, कोच्ची, लक्षद्वीप आयलॅंड आणि श्रीलंका या सागरी किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये प्रवासाची संधी मिळणार आहे. भारतामध्ये क्रुझ कल्चर आणि बोटीच्या प्रवासाचा आनंद मिळावा म्हणून Cordelia Cruises प्रयत्न करणार आहे. (नक्की वाचा: Aadhar सोबत IRCTC अकाउंट करा लिंक, एका महिन्यात बुक करता येतील 12 तिकिट बुकिंग).

 IRCTC  ट्वीट  

टूर डेस्टिनेशन काय असतील?

मुंबई - गोवा - मुंबई (2N)

- मुंबई - दीव - मुंबई (2N)

- मुंबई - अ‍ॅट सी - मुंबई (2N)

- कोच्ची - लक्षद्वीप - अ‍ॅट सी - मुंबई (3N)

- मुंबई - अ‍ॅट सी - लक्षद्वीप - अ‍ॅट सी - मुंबई (4N)

- गोवा - मुंबई - अ‍ॅट सी -लक्षद्वीप - अ‍ॅट सी - गोवा (5N)

- चैन्नई - अ‍ॅट सी - कोलंबो (2N)

- चैन्नई - जाफना - चैन्नई (2N)

- चैन्नई - अ‍ॅट सी - कोलंबो - Galle - Trincomalee - चैन्नई (5N).

कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळतील?

Cordelia Cruises वर रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, बार, ओपन सिनेमा, थिएटर, किड्स एरिआ, जीम असणार आहे. या सुविधा इंटरनॅशनल क्रुझ लायनर प्रमाणे देण्याचा प्रयत्न होणार आहे.

सुरूवातीला मुंबई बेस वरून गोवा, दीव, लक्षद्वीप, श्रीलंका येथे प्रवास करता येणार आहे. तर दुसरा टप्पा मे 2022 पासून सुरू होईल त्यामध्ये कुझ चैन्नईला शिफ्ट केली जाईल आणि श्रीलंकेच्या Colombo, Galle, Trincomalee, आणि Jaffna ला प्रवास करता येईल.