IRCTC द्वारा तुम्ही आज रात्री तिकीट बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर तुमची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज IRCTC ची वेबसाईट आणि मोबाईल अॅप सुमारे सहा तास ठप्प राहणार आहे. त्यामुळे ना तुम्ही ऑनलाईन तिकीट करू शकणार ना बुक केलेले तिकिट रद्द करण्याची सोय तुम्हांला ऑनलाईन माध्यमातून मिळणार नाही. एका नोटिफिकेशनद्वारा IRCTC च्या ऑनलाईन माध्यमातून तिकीट बुक आणि रद्द करण्याची सोय 12.20 वाजल्यापासून बंद राहणार आहे.
IRCTC च्या मोबाईल अॅपचा वापर करत असल्यास ही सोय तुम्हांला सकाळी सहा वाजल्यापासून मिळणार आहे. IRCTC च्या मेनटेनस अॅक्टिव्हिटीसाठी सुमारे सहा तास सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. एरवी विशिष्ट झोनमध्ये साईट बंद ठेवली जाते मात्र आज सार्या झोनमध्ये एकाचवेळेस साईट ठप्प राहणार आहे.
IRCTC च्या वेबसाईटद्वारा तिकिट बुकिंग कर्ता येऊ शकते. स्लीपर क्लास, फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी क्लास सोबतच एसी चेयरकारचे तिकीटदेखील बुक केले जाऊ शकते. सुमारे120 दिवस आधी तिकिट बुकिंग करण्याची सोय ऑनलाईन माध्यमातून दिली जाते.