IndiGo Web-Check-In: इंडिगो 'वेब चेक इन'साठी मोजावे लागणार पैसे
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: ANI)

देशातील दोन मोठ्या विमानसेवा इंडिगो (Indigo) यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी धोरणात मोठे बदल केले आहेत. इंडिगोने वेब चेक इन (web check in) साठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

विमानतळावरील लांबलचक रांग टाळण्यासाठी अनेकदा वेब चेक इनचा पर्याय निवडला जातो. मात्र आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय जेट एअरवेजच्या विमानातून इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाऊंजचा वापर करता येणार नाही.

आपले वेब चेक इन पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना एका सीटचे पैसे भरावे लागणार आहेत, असे  इंडिगोने ट्विटरवरुन सांगितले आहे. आमच्या बदललेल्या धोरणांनुसार, वेब चेक इनसाठी सर्व आसनांकरीता पैसे आकारण्यात येणार आहेत. मनाप्रमाणे आसन मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचेही इंडिगोने स्पष्ट केले आहे. मात्र विमानतळावरुन चेक इन करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही असेही इंडिगोने सांगितले आहे.  या निर्णयानंतर प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

आसन निवडीसाठी एका प्रवाशाला सुमारे 200 ते 1000 रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. त्याचबरोबर इंडिगोमध्ये जर तुम्ही 12 आणि 13 व्या रांगेतील आसन निवडणार असाल तर तुम्हाला 600 रुपये मोजावे लागतील. तर दुसऱ्या रांगेपासून ते दहाव्या रांगेपर्यंत सीट्स निवडीसाठी तुम्हाला 300 रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच 11 व्या, 14 व्या किंवा 20 व्या रांगेतील सीट्ससाठी 200 रुपये भरावे लागतील.