गो एअर लाईन्स (GoAirlines) कंपनीने तुमचा सुट्टयांमधील प्रवास अधिक सुखकर आणि स्वस्त करण्यासाठी खास ऑफर सादर केली आहे. या नव्या ऑफर अंतर्गत डोमॉस्टिक फ्लाईट्सचे तिकीट 899 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही नवी ऑफर देशांतर्गत प्रवासावर 1,375 रुपयांच्या तिकीटांपासून सुरु होणार आहे.
फ्लॉय स्मार्ट इंडिया सेल अंतर्गत एअरलाईन्स 24-30 मे दरम्यान होणाऱ्या बुकींगवर डिस्काऊंट देत आहे. गो एअर वेबसाईटनुसार, ही ऑफर 15 डिसेंबर, 2019 पर्यंत सुरु असेल.
अहमदाबाद, बडोदा, बंगळुरु, भुवनेश्वर, दिल्ली, चेन्नई, गोवा, गुवाहटी, हैद्राबाद, कोची, कोलकत्ता, लेह, लखनऊ, मुंबई, पटना, पुणे आणि पोर्ट बेअर या भागात प्रवास करणाऱ्या तिकीटांवर ऑफर्स दिल्या जात आहेत.
24-30 मे दरम्यान बंगलोर ते गुवाहटी या विमानप्रवासाठी कमीत कमी दर आकारले जात आहेत. तर 1-31 जुलै दरम्यान लेह ते दिल्ली प्रवासासाठी 6,599 रुपये दर आकारले जात आहेत.
तसंच गो एअर मेगा मिलियन सेल ची आजपासून सुरुवात होणार आहे. यात 27 मे पासून तीन दिवस प्रवाशांना या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. या काळात बुकिंग केलेल्या प्रवाशांना 15 जून ते 31 डिसेंबर या काळात प्रवास करता येईल. तसंच पेटीएम आणि मिंत्रा अॅपवर विशेष ऑफर्स देण्यात येत आहेत. पेटीएमद्वारे 2 हजार 499 रुपयांपर्यंतचं तिकीट खरेदी केल्यास 500 रुपयांची कॅशबॅक मिळेल. तर 1 हजार 999 रुपयांपर्यंतचं तिकीट मिंत्रा अॅपद्वारे खरेदी केल्यास 10% डिस्काऊंट मिळेल. या दोन्ही ऑफर्स 31 ऑगस्टपर्यंत सुरु असतील.