आग्रा मधील असे एक ठिकाण जेथे मृत व्यक्तीला त्याच्याच घरात पुरावे लागते, याबद्दल अधिक जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतामधील (India) विविध धर्मातील लोकांना त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीनुसार दहन केले जाते. मात्र आग्रा (Agra) येथील असे एक ठिकाण आहे जेथे मृत झालेल्या व्यक्तीला त्याच्याच घरात पुरावे लागते. तर या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तीच्या घरतील लोकांना मृतदेह पुरण्यासाठी मुठभर जागासुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच घराची थोडीशी जागा स्मशानभुमी म्हणून वापरावी लागते.

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, आग्रामधील पोखर गावातील नागरिक आजसुद्धा परिवारातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याला त्यांच्याच घरात पुरावे लागते. तर काही नागरिक स्वयंपाक घराच्या खोलीतील जमिनीत मृतदेह पुरतात. गावातील एका महिलेने असे सांगितले की, जेव्ही तिच्या आजीचा मृत्यू झाला तेव्हा तिला घरातील स्वयंपाक घराच्या जमीनीत गाढले गेले. तसेच अजून एका महिलेने सांगितले की, ती ज्या ठिकाणी जेवण बनवते त्याच्याच बाजूला तिच्या दोन मुलांना पुरले आहे.(पावसाळ्यात आपल्या जोडीदारासह चिंब भिजण्यासाठी महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणे)

तर गावात बहुसंख्य नागरिक मुस्लिम परिवारातील असून गरीब आणि भुमीहीन आहेत. परिवारामधील पुरुष मंडळी मजुरी करुन आपल्या घरातील मंडळींचे पोट भरावे लागते. तसेच गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सरकार गावात एखादी स्मशानभुमी कधी उभारणार याची वाटत पाहत आहे.