Pondicherry, Om Beach (Photo Credits: Wikimedia Commons)

31st डिसेंबरसाठी मोजून 8 दिवस उरले आहेत. इतका कमी वेळ असताना देखील तुम्ही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी काहीच प्लॅन बनवले नसतील तरीही अजिबात अपसेट होऊ नका. कारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत टॉप 5 बजेट ट्रिपच्या डेस्टिनेशन्सची ही यादी. खूपच कमी खर्चात तुम्ही या जागांना भेट देऊ शकता. आणि तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करणार असाल तरी काहीच हरकत नाही. कारण ही ठिकाणं इतकी हॅपनिंग आहेत कि तुम्हाला अजिबात एकटं फील होणार नाही.

गोकर्ण

कर्नाटक राज्यातील गोकर्ण हे ठिकाण तसं देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पण पर्यटकांसाठी पण हे ठिकाण नेहमीच हिट ठरते. सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. कर्नाटकातील सागरी किनाऱ्यावरील हे ठिकाण परदेशी पर्यटकांना देखील खूप आवडते. विशेष म्हणजे ओम बीच, कुदळे बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाइझ बीच, हे इथले काही प्रसिद्ध बीच आहेत. तिथे तुम्हाला शॅक्समध्ये राहता येत आणि अनेक शॅक्स फक्त 300 ते 400 रुपयांमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे एखादी सायकल किंवा स्कुटर रेंट करून तुम्ही हमखास इथे फिरू शकता.

हंपी

कर्नाटक राज्यातील अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हंपी. हेरिटेज साईट म्हणून ओळखलं जाणारं हंपी हे ठिकाण हिप्पी पर्यटकांसाठी अगदी परफेक्ट आहे. कारण हंपी आयलंडवर असणाऱ्या विविध कॅफेमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि न्यू इयर साठी हे अगदी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते कारण इथे अनेक परदेशी पर्यटक खास रॉक कलाईम्बिंगसाठी येतात. इथे राहण्यासाठी अनेक हॉस्टेलचे पर्याय आहेत जिथे तुम्हाला बंक बेड देण्यात येतो. 500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे इथे स्टे उपलब्ध आहेत.

कोडाईकॅनल

तामिळनाडू राज्यातील कोडाईकॅनल हे हिल स्टेशन अगदी तुमच्या खिशाला परवडेल असंच आहे. अनेक स्टेचे ऑप्शन तुम्हाला इथे मिळतात. निसर्गाच्या कुशीत जर तुम्हाला जायचं असेल तर कोडाईकॅनल नक्की ट्राय करा. सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हे डेस्टिनेशन अगदी परफेक्ट आहे. त्याचसोबत छोटे ट्रेक्स पण इथे तुम्ही करू शकता.

जयपूर

'पिंक सिटी' म्हणून प्रसिद्ध असणारं राजस्थानमधील जयपूर हे शहर नेहमीच पर्यटकांसाठी आवडीचं ठिकाण असतं. डिसेंबर महिना जयपूरची अगदी परफेक्ट आहे कारण गुलाबी थंडी काय ही तुम्हाला इथे याच महिन्यात अनुभवता येईल. जयपूरमध्ये हॉटेल्सची अजिबात कमी नाही. अगदी 200 ते 300 रुपयांपासून ते अगदी हजारोंमध्ये, अनेक स्टे तुम्हाला इथे मिळतात.

New Year Plans 2020: यंदाचा 31st December साजरा करण्यासाठी हे आहेत मुंबई जवळील 5 हटके कॅम्पिंग स्पॉट्स 

पॉंडिचेरी

पॉंडिचेरी हा तामिळनाडूमधील एक केंद्र शासित प्रदेश आहे जो अध्यात्म, बीच, फ्रेंच कॉलोनी आणि वॉटर स्पोर्ट्स यासाठी प्रसिध्द आहे. इथे फ्रेंच स्टाईल व्हिला, शॉपिंग सेंटर, बुटीक आणि बरीच प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळतात. इथल्या ऑरोबिंडो आश्रमात तुम्ही जाऊ शकता, सर्फिंग आणि डायव्हिंगचे धडे घेऊ शकता, ऑरोविलमध्ये एक दिवस घालवू शकता आणि अनोखी फ्रेंच संस्कृती असलेल्या या ठिकाणी तुम्ही बरेच काही करू शकता. इथे अनेक हॉस्टेल स्टे उपल्बध आहेत. आणि शहर छोटा असल्याने तुम्ही सायकलने फिरू शकता.