जेव्हा तोड स्वच्छ ठेवण्याचा प्रश्न येतो त्यावेळी लोक प्रथम दातांच्या साफसफाईकडे लक्ष देतात. मात्र तोंडामधील मुख्य भाग जीभ याच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र जीभेची स्वच्छता न ठेवल्याने आजारपणाला आमंत्रण देण्याचे कारण ठरु शकते.
तसेच जीभेची स्वच्छता न ठेवल्यास तोंडातून घाण वास येण्यास सुरुवात होते. त्याचे परिणाम आरोग्यावर होऊन व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे 'या' काही सोप्या उपायांचा वापर करुन तुम्ही जीभेची स्वच्छता ठेऊ शकता.
मीठ (Salt)
मीठ हे प्राकृतिक स्वरुपात जीभेची स्वच्छता करण्यासाठीचे स्क्रब मानले जाते. मीठ जीभेवर टाकून टूटब्रशच्या पाठील बाजूने जीभेवर घासले असता त्यावरील घाण निघून जाते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केला तर उत्तम.
माऊथवॉश (Mouth Wash)
जेवल्यानंतर अन्नाचा काही अंश जीभेवर राहतो. त्यामुळे खाल्ल्यानंतर माऊथवॉशचा वापर करावा.
बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोड्यामध्ये लिंबूचे काही थेंब मिसळावे, त्यानंतर त्याची पेस्ट करुन ती जीभेवर काही मिनिटांसाठी ठेवावी. यामुळे जीभेवर साचलेली सफेद थर आणि घाण सहजपणे निघून जाते.
दही (Curd)
दही प्रो- बायोटिक असते. यामुळे जीभेर साठलेली बुरशी, घाण आणि सफेद थर निघून जातो.
हळद (Turmeric)
हळदीमध्ये थोडा लिंबूचा रस टाकून त्या मिश्रणाने जीभेवर मसाज करावे. तर काही मिनिटांनी ते साफ करुन धूवून टाकावे.
अननस (Pineapple)
अननसमध्ये ब्रोमलेन इन्झाइम असते. जे तुमच्या जीभेवरील काळे डाग काढून टाकण्यास मदत मिळते. तर जीभेवरील मृत स्किनला सुद्धा हटवण्याचे काम करते.