ज्या घरात काही समस्या नाहीत असे घर सापडणे कठीण, मात्र प्रत्येक घरात नेहमीच सुखाचा वास राहील असे नाही. घरात अनेक दिवसांपासून चाललेली दुखणी, पैशांची कमतरता, तंटे, प्रगती न होणे अशा दुर्भाग्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, यासाठी जितके तुमचे कर्म महत्वाचे आहेत तितक्याच घरात असणाऱ्या काही वस्तू अथवा गोष्टीही महत्वाच्या आहेत. प्रिय असतात, आठवणी जोडल्या गेलेल्या असतात अशा अनेक कारणांनी घरात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या जातात. मात्र अशाच अडगळीच्या गोष्टींमुळे दुर्भाग्य आपली पाठ सोडत नाही. यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरसा. तर तुमच्याही घरात असा आरसा असेल तर तो ताबडतोब काढून टाका. तशाच इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे घरात समाधान नांदत नाही. चला पाहूया काय आहेत काय आहेत या गोष्टी.
> घरात फुटलेला आरसा कधीही ठेऊ नये. फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने दुर्भाग्य वाढते आणि घरात नकारात्मकता राहते. त्यामुळे फुटलेल्या आरशात कधीही चेहरा पाहू नये.
> घरातील टाकीतून अथवा नळातून होणारी गळती ही आर्थिक विवंचनेला आमंत्रित करते.
> घरातील भिंती नेहमी साफ ठेवा. रंग उडाला असेल, पोपडे निघाले असतील तर ते ताबडतोब ठीक करा कारण दुर्भाग्य गरिबीला आकर्षित करते.
> घरामध्ये कोळ्याचे जाळ नसावे असे सांगितले जाते. हा अंधविश्वास नसून यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळ्याच्या जाळ्यांची संरचना काहीशी अशी असते की, त्यामध्ये नकारात्मक उर्जा एकत्रित होते. (हेही वाचा : जाणून घ्या घरात मनीप्लांट लावण्याचे फायदे आणि ठेवण्याची योग्य दिशा कोणती))
> फाटलेल्या, जुन्या कपडय़ांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारचे कपडे दान करावेत किंवा इतर कामांमध्ये उपयोग करावा.
> देवी-देवतांचे फाटलेले फोटो किंवा जुनी, खंडित मूर्ती घरात ठेवू नये. त्या मूर्ती नदीमध्ये सोडाव्यात. तसेच एकाच देवतेच्या तीन-तीन मूर्ती घरामध्ये ठेवू नयेत.