फेब्रुवारी महिना म्हटले की, जगातील सर्वच कपल व्हॅलेंटाइन वीकची (Valentine Week) आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, काही लोक आपल्या जोडीदाराला गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर, कुणी पार्टनरला रोमॅंटिक डेटला घेऊन जातात. व्हॅलेंटाइन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. या दिवसाची वेगळी खासियत आहे. टेडी डेच्या (Teddy Day 2021) दिवशी प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला सुंदर दिसणारा टेडी बेअर भेट म्हणून देतात. याशिवाय, तुम्ही आपल्या जोडीदाराच्या आनंदात आणखी भर घालण्यासाठी खालील सुंदर मॅसेजदेखील पाठवू शकतात.
प्रियकर आणि प्रेयसी यांच्यासह पत्नी, पती आणि इतर आवडीच्या व्यक्तीला तुम्ही टेडी देऊ शकतात. ‘टेडी डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजणांना त्यांच्या आवडीच्या रंगाचे टेडी बेयर गिफ्ट करू शकतात. एवढेच नव्हेतर त्याला खालील मराठी संदेश पाठवून आपले प्रेम व्यक्त करू शकतात. हे देखील वाचा- Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!
मी दिलेला टे डी बेअर जपून ठेव
तुझ्याशी खूप प्रेम करतो,
जेव्हा-जेव्हा मी तुझ्यापासून दूर असतो
तेव्हा- तेव्हा तोच तुझ्यासोबत असतो.
टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या हृदयात फक्तू तूच आहेस
माझ्या जगण्याचे कारण तू आहे,
तुझ्याकडून टेडी बेअर मिळावी अशी इच्छा माझी
आणि मागण्याचा आज दिवसदेखील आहे.
टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण
राहुदे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा!
डेटी बेअरला पाहून तुझीच आठवण येते
काय सांगू तुला तुच माझी सॉफ्ट डेटी वाटतेस
टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा!
महत्वाचे म्हणजे, तिसऱ्या शतकात रोममध्ये तिसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेमी युगुलांवर अनेक बंधने लादली होती. एवढेच नव्हेतर प्रेम करणाऱ्यांवर त्याने अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. अविवाहित पुरूष विवाहित पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगले असतात, असे मत क्लॉडियस यांचे मत होते. यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. धर्मगुरू संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती. परंतु, राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे राजाने त्यांना 14 फेब्रुवारीला फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.