Tarot Card Reading and Prediction: ज्योतिषशास्त्र हे जसे व्यक्तीचे भूत, वर्तमान आणि भविष्य आदी काळाबाबत 12 राशींची भविष्यवाणी करते तसेच, टॅरो कार्ड (Tarot Card ) हे देखील भविष्य सांगते. भविष्यात घडणाऱ्या सादक, बाधक घडामोडींविषयी संकेत देते. आपल्याकडे टॅरो कार्ड भविष्य हा प्रकार प्रचलीत असला तरी फारसा लोकप्रिय नाही. पण, तरीसुद्धा टॅरो कार्ड जाणकाराकडून भविष्य जाणून घेणारांची संख्या कमी नाही. त्यामुळे आज इथे येणारा आठवडा (8 एप्रिल ते 14 एप्रिल) टॅरो कार्डच्या दृष्टीकोनातून मेष (Arise), वृषभ (Taurus), मिथुन (Gemini), कर्क (Cancer), सिंह (Leo), कन्या (Virgo), तुळ (Libra), वृश्चिक (Scorpio), धनु (Sagittarius), मकर (Capricornus), कुंभ (Aquarius), मीन (Pisces) या बारा राशींचे भविष्य पाहणार आहोत. आपण जरी विज्ञानाचा पुरस्कार करत असलो तरी ज्योतिष, भविष्य आणि कुंडली मानणारी मंडळी कमी नाहीत. त्यामुळे जोपर्यंत बघणारे आहेत तोपर्यंत दाखवणारे राहणारच आहेत. मग ते भविष्य असो किंवा कला. आपल्यापैकी राशिभविष्य आणि कुंडली पाहून येणारा काळ कसा राहील हे जाणून घ्यायला आपल्यापैकी अनेकांना आवडते. त्यामुळे अशा मंडळींच्या ज्योतिषावर उड्या पडल्या नाहीत तरच नवल.
टॅरो कार्ड आणि 12 राशींसाठी येणारा आठवडा
मेष (Arise)
रागावर नियंत्रण ठेवा. कुटूंबीयांवर विश्वास ठेवा. घरातल्या लोकांसोबत खटके उडण्याची शक्यता. समस्या जाणून घ्या प्रश्नांना थेट भीडा. डोळे बंद करुन दुर्लक्ष केल्याने समस्या सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. निर्धाराने वास्तवाला सामोरे जा. विचार करुन बोला. मोठे वक्तव्य करण्या आगोदर काही विचार करा. कोणाच्या सांगण्यावरुन मतं ठरवू नका.
वृषभ (Taurus)
आर्थिक स्थिती चांगली राहील. लक्ष्मी प्रसन्न आहे. त्यामुळे धनलाभाची शक्यता. कर्ज अथवा कोणाताही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शक्य असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. शक्यतो ताकदीपेक्षा मोठी कामे अंगावर घेऊ नका. आपल्या गोड बोलण्याने ताणलेले संबंध निवळतील. आपलया प्रसिद्धीतही चांगली वाढ होईल. आळस झटकून कामाला लागा.
शुभ अंक — 6
शुभ रंग — लाल
मिथुन (Gemini)
प्रवासाचा योग आहे. नोकरी शोधत असलेल्या मंडळींना चांगली बातमी मिळण्याची शक्यता. संवाद साधण्याला प्राधान्य द्या. उगाच मनात दुरावा धरुन बसू नका. वेळ वाया घालवू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. उगाच संशय घेत बसू नका. अभ्यासाने समस्येच्या मुळाशी गेल्याने समस्येचा निपटारा शक्य.
शुभ अंक — 3
शुभ रंग — निळा
कर्क (Cancer)
समस्यांचा आणि आव्हानांचा सामना होण्याची शक्यता. विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता. डोके शांत ठेवा. एक पाऊल मागे जाण्याची तयारी ठेवा. याचा अर्थ सतत कमीपणा घ्या असा नव्हे. संकटात धैर्य कामी येईल. धैर्य आणि आत्मविश्वास गमावू नका.
शुभ अंक — 1
शुभ रंग — साधारण
सिंह (Leo)
संधीचं सोनं करण्याची संधी मिळेल. डोळे, कान उघडे ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. संधी दरवाजावर टकटक करते आहे. गरज आहे फक्त योग्य विचार आणि योग्य वेळी योग्य निर्णयाची.
शुभ अंक — 9
शुभ रंग — शेंदरी
कन्या (Virgo)
भावनेच्या भरात उगाच काहीतरी आश्वासने देऊ नका. वक्तव्ये करताना ती वादग्रस्त ठरणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्यातला अष्ठपैलू (मल्टी टास्किंग) स्वभाव आपल्याला मोठे यश मिळवून देऊ शकेल. खाण्यापीण्याकडे लक्ष द्या. आकर्षण आणि उगाच कोणाच्या तरी अती प्रेमात पडणे यापासून स्वत:ला सांभाळा.
शुभ अंक — 3
शुभ रंग — पांढरा
तुला (Libra)
हा आठवडा आपल्याला विशेष महत्त्वाचा राहील. संकटे येतील. पण, संकटांचा सामना यशस्वी केल्यास यशाचा मार्ग नक्की मोकळा होईल. महत्त्वाचे म्हणजे आपल्या यशात वाटेकरी निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. पद, पैसा, प्रसिद्धी योग्यतेनुसार मिळण्याचा संभव. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा. आरोग्याला जपा.
शुभ अंक — 8
शुभ रंग — लाल
वृश्चिक (Scorpio)
भागीदारी करताना विचारपूर्वक करा. विविध विषयांची सोडवणूक करताना कुटूंबीयांशी त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करा. कोणतीही भूमिका घेताना सावधगिरी बाळगा. तुमची भूमिका इतरांच्या दृष्टीकोणातून संशयाचे मोहोळ तयार करु शकते. चर्चा आणि संवाद आदींच्या माध्यमातून समस्येवर तोडगा निघेल. समस्या सोडवताना एकट्याने लढण्याऐवजी मदत घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण होईल इतकेच कार्य हाती घ्या. जाणकारांचा सल्ला फायद्याचा राहील.
शुभ अंक — 6
शुभ रंग — लाल
धनु (Sagittarius)
धनप्राप्तीचा योग आहे. संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा. संकटांचा सामना करताना विजयाचा आऩुभूती घेता येणे शक्य. नेतृत्व सिद्ध करु शकता. टीमसोबत काम करतान सर्वांना सोबत घ्या. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चेहऱ्यावर स्मित ठेवा. लोकांना कार्यात सहभागी करुन घ्या.
शुभ अंक — 4
शुभ रंग — हिरवट पिवळा
मकर (Capricorn)
उत्साह वाढवणारा आठवडा. सेमिनार, कॉन्फरन्स आदी गोष्टीत आपल्या व्यापक दृष्टीकोणाची छाप पडेल. विवाहासाठी अनुरुप काळ. प्रवास, परदेशागमनाची संधी मिळण्याचा संभव. दिवसाची सुरुवात लवकर करा. लाळघोटेपणा टाळा. लाळघोटेपणा केल्यास तात्परता फायदा शक्य. मात्र दीर्घकालीन त्रास आणि शत्रू निर्माण होण्याचाही संभव. त्यामुळे विचारपूर्वकच वागा.
शुभ अंक — 5
शुभ रंग — पांढरा
कुंभ (Aquarius)
न मागता सल्ला देण्याचा प्रयत्न करु नका. सद्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ अनुकरण करणे टाळा. स्वत:च्या क्रियेटीव्हीटीला वाव द्या. वास्तवाचा विचार करा. स्वप्नरंजनापासून दूर राहा.
शुभ अंक — 7
शुभ रंग —
मीन (Pisces )
इतरांवर नियंत्रण मिळविण्यापेक्षा स्वत:च्या कामाकडे ध्यान द्या. कठोर मेहनतीची गरज. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. फक्त त्याला कार्यात सहभागी करुन घ्या. शिक्षणासाठी अनुकूल काळ. प्रलंबीत कामे मार्गी लागतील. तसेच, अशा कामांना गती मिळणे शक्य. वडीलधाऱ्यांचा सल्ला जरुर घ्या.
शुभ अंक — 3
शुभ रंग — पिवळा नारंगी.
आपण जरी विज्ञानाचा पुरस्कार करत असलो तरी ज्योतिष, भविष्य आणि कुंडली मानणारी मंडळी कमी नाहीत. त्यामुळे जोपर्यंत बघणारे आहेत तोपर्यंत दाखवणारे राहणारच आहेत. मग ते भविष्य असो किंवा कला. आपल्यापैकी राशिभविष्य आणि कुंडली पाहून येणारा काळ कसा राहील हे जाणून घ्यायला आपल्यापैकी अनेकांना आवडते. त्यामुळे अशा मंडळींच्या ज्योतिषावर उड्या पडल्या नाहीत तरच नवल. त्यामुळे आम्ही ही माहिती देत असतो. मात्र, वाचकांनी आपला विज्ञानवादी दृष्टीकोनच कायम ठेवावा. इथे दिलेली माहिती केवळ ज्ञान आणि जिज्ञासा यासाठी जाणून घ्यावी. ही माहिती केवळ संकेतांवर आधारीत आहे. त्याचा वास्तवाशी तंतोतंत संबंध लागेलच असे नाही. या माहितीशी लेखक अथवा लेटेस्टली मराठी सहमत असतीलच असेही नाही.