Skin Care Tips: आंबा खाताना 'घ्या' अशी काळजी, चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास होईल कमी
skin Care TIPS in Summer pc Pixabay

Skin Care Tips: फळाचा राजा आंबा (Mango) हा तर सगळ्यांच्या आवडीचा असतो. प्रत्येकजण उन्हाळ्यात आंबा खातो. आयोग्यासाठी फादयेशीर असलेल्या फळांपैकी एक फळ आहे. जसे फायदे आहे तसेच आंबा खाल्ल्याचे तोटे देखील होता. जास्त आंबा खाल्ल्याने शरिरात अधिक उष्णता वाढते आणि अधिक सेवन केल्यामुळे शरिरात काही बदल होत असतात. काहींच्या चेहऱ्यांवर फोड येतो. तर उष्णतेमुळे कोरडेपणाचा देखील त्रास होते. आंबा खाताना अशी काळजी (Skin Care) घ्या जेणे करून तुमच्या चेहऱ्यावर मुंरुम (Pimple) येणे कमी होतील. (हेही वाचा- एनर्जी टिकवण्यासाठी नवरात्रीच्या उपवासात काय खावे? जाणून घ्या उपवासाची आरोग्यदायी पद्धत

स्वच्छ धुवून सेवन करा

आंबा स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नका. एका पातेळ्यात पाणी घ्या आणि त्यात थोड्यावेळासाठी आंबे भिजवण्यासाठी ठेवा. याने आंब्यावरिल खाण बाहेर पडतील.  जर स्वच्छ धुतलेला आंबा खाल्ला नाही तर तुमच्या चेहऱ्यावर फोड येऊ शकतो. आंबाच्या तोंडावर असलेला चिक किंवा चिकट पदार्थ आपल्या स्किनसाठी हानीकारण असतो.

रात्री सेवेन करू नये

आंबा हा अधिक उष्ण फळ असतो. रात्री शरिराची उष्णता कमी राहते त्यामुळे रात्रीच्या वेळीस आंबा खाणे टाळा. रात्री आंबे खाल्याने पोटात गरम पडू शकते त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येते. त्याचप्रमाणे, पोटात ही गडबड होण्याची शक्यता वाढते.

साय आणि हळद

उन्हाळ्यात जर तुम्ही आंब्याचे सेवन जास्त करत असाल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असेत तर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर किंवा ज्या ठिकाणी पिंपल्स आहे तेथे साय आणि हळदीचे मिश्रण लावा. आणि ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवा.