Smoking (PC -Pixabay)

Quit Smoking Before Age of 40: लोक 40 वर्षापूर्वी धूम्रपान सोडतात ते धूम्रपान (Smoking) न करणाऱ्यांसारखेच जीवन जगतात, असं निरीक्षण एका संशोधनात समोर आले आहे. NEJM Evidence या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक कोणत्याही वयात धूम्रपान सोडतात ते धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच जगू शकतात. टोरंटो विद्यापीठातील दल्ला लाना स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक प्रभात झा यांनी सांगितले की, 'धूम्रपान सोडणे मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे. लोकांना त्याचे फायदे खूप लवकर मिळू शकतात.' (हेही वाचा - Financial Aid to Quit Smoking: काय सांगता? धुम्रपान सोडण्यासाठी मिळणार आर्थिक मदत; इंग्लंडच्या Cheshire East शहरात सुरु होत आहे नवी योजना)

या अभ्यासात चार देशांतील (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि नॉर्वे) 1.5 दशलक्ष प्रौढांचा समावेश होता, ज्यांचे 15 वर्षे निरीक्षण करण्यात आले होते. 40 ते 79 वयोगटातील धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका जवळजवळ तिप्पट होता, म्हणजे त्यांनी सरासरी 12 ते 13 वर्षे आयुष्य गमावले. (हेही वाचा -Cigarette Smoking Research: सावधान! धूम्रपानामुळे मेंदू संकुचित होऊन अकाली वृद्धत्व येते; संशोधनात धक्कादायक खुलासा)

धूम्रपान सोडणाऱ्यांना मृत्यूचा धोका 1.3 पट ने कमी -

संशोधकांना असे आढळून आले की, ज्यांनी यापूर्वी धूम्रपान सोडले होते त्यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत मृत्यूचा धोका 1.3 पट (किंवा 30 टक्के जास्त) असतो. कोणत्याही वयात धूम्रपान सोडणे दीर्घकाळ जगण्याशी संबंधित होते. ज्यांनी धूम्रपान सोडले त्यांचे आयुष्य सहा वर्षांपर्यंत वाढले होते, असे अभ्यासात सांगण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त, जे धूम्रपान सोडतात त्यांना श्वसनाच्या आजारामुळे मृत्यूचा धोका कमी होतो.