Shani Jayanti 2019: सध्या या राशींना चालू आहे साडेसाती; शनि जयंतीला करा हे उपाय, दूर होतील सर्व समस्या
शनि जयंती 2019 (Photo Credits: File Image)

3 जून रोजी देशात सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने शनि जयंती (Shani Jayanti) साजरी केली जाईल. शनि म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती साडेसाती (Sade Sati). सर्वसाधारणपणे जीवनातील अतिशय वाईट काळ म्हणून साडेसातीकडे पाहिले जाते. मात्र साडेसाती फक्त इतकीच नसून त्या काळ कैक गोष्टींची शिकवण देऊन जाते. आपल्या स्वभावात, विचारांत बदल घडवून प्रगतीचे नवे मार्ग शोधून देते. सध्या वृश्चिक, धनू आणि मकर या राशींना साडेसाती चालू आहे. तर कन्या आणि वृषभ राशीवर साडेसातीच्या अडीचकीचा प्रभाव राहील.

शनिने 26 ऑक्टोबर 2017, गुरुवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिट आणि 42 सेकंदावर वृश्चिक राशीतून धनू राशीत गोचर केला होता आणि आता 24 जानेवारी 2020 पर्यंत शनि धनू राशीत राहणार आहे. त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल.

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिजयंती चा दिवस अतिशय उत्तम योग आहे. यादिवशी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या उपायांचे फळ नक्कीच मिळते. चला तर पाहूया काय आहेत हे उपाय. (हेही वाचा: शनि जयंती दिवशी तब्बल 149 वर्षानंतर दुर्मिळ योग; साडेसातीची छाया, जाणून घ्या आपल्या राशीवर काय पडेल प्रभाव)

  • शनिमाहत्याचे वाचन आणि काळ्या घोड्याची नाळ मध्यमा बोटात धारण केल्याने शनिदेव शांत होतात.
  • मारूतीची उपासना करून त्याला रुईची फुले आणि पाने यांची माळ घालून काळे उडीद अन् तेल वाहिल्यामुळे शनीची पीडा दूर होते.
  • काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्‍तू बांधावी. त्‍याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे. त्‍यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्‍यक्तिस काळे वस्त्र आणि त्‍यात गुंडाळलेल्‍या वस्‍तू दान कराव्‍यात.
  • अंधार झाल्यानंतर, पिंपळाच्या झाडाला गोड पाणी वाहा, तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा आणि धूप लावा. तेथे बसून क्रमशः हनुमान, भैरव आणि शनि यांच्या नावाचा जप करा.
  • एखाद्या गरीब व्यक्तीला काळी घोंगडी, अन्न अथवा लोखंडाचे भांडे दान करा.
  • साडेसाती सुरु असताना दररोज अंघोळीनंतर खालील मंत्र किमान 11 वेळा म्हणा, म्हणताना शनि शिंगणापुरच्या शनिदेवतेचे ध्यान करा.

सुर्यपुत्रो दीर्घा देहि विशालाक्षा शिव प्रियः।

मंदाचारा प्रसन्नात्मा पीड़ां हरतु मे शनि ॥

साडेसाती मध्ये श्रीशनि महाराज हे स्त्रियांना मुळीच त्रास देत नाहीत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शनि महाराजांच्या आईने, कोणत्याही स्त्रियांना साडेसातीचा त्रास होणार नाही असे सांगितले होते, त्यामुळे स्त्रियांच्या राशीत साडेसाती नसते.