Shani Jayanti 2019: शनि जयंती दिवशी तब्बल 149 वर्षानंतर दुर्मिळ योग; साडेसातीची छाया, जाणून घ्या आपल्या राशीवर काय पडेल प्रभाव
Shani Jayanti 2019 (File Photo)

येणाऱ्या जून महिन्यातील 3 तारखेचा दिवस खूप महत्वाचा आहे. यादिवशी देशात सर्वत्र शनि जयंती (Shani Jayanti) साजरी केली जाईल. शास्त्रानुसार अनुसार ज्येष्ठ महिन्याच्या आमावस्येला सूर्य आणि छाया यांचा पुत्र शनि देवाचा जन्म झाला होता. शनि आणि साडेसाती यांचे महत्व आपण जाणतोच, त्यामुळे हा दिवस शनि महाराजांना प्रसन्न करून घेण्याची फार चांगली संधी आहे. तसेच कित्येक वर्षांनतर यंदा या दिवशी एक दुर्मिळ योग बनत आहे. 3 जून, सोमवारी शनि जयंती आणि सोमवती अमावस्या एकत्र येत आहेत. या दिवशी अनेक लोकांचे नशीब फळफळनार आहे. देशात याच दिवशी वट पौर्णिमाही साजरी केली जाईल.

यादिवशी शनिच्या केतूसह, गोचरमध्ये शनि जयंती व सोमवती अमावस्या एकत्रित येतील. याच दिवशी स्नानाचे विशेष पर्वदेखील आहे. ज्योतिषचार्यांच्या मते, हा शुभ संयोग तब्बल 149 वर्षांनंतर येत आहे. याआधी 30 मे 1870 रोजी असाच दुर्मिळ योग आला होता.

जाणकारांच्या मते ज्या राशींवर शनिचा प्रकोप अथवा साडेसाती चालू आहे, त्यांच्यासाठी या मुहूर्तावर भगवान शनिची पूजा करणे फायदेशीर होईल. शनि जयंतीच्या दिवशी सर्वार्थसिद्धि योग बनणार आहे, ज्याचा प्रभाव पूर्ण दिवस व रात्रीच्या वेळी देखील राहील.

दोन जून रोजी सुरू होईल अमावस्या

अमावस्या प्रारंभः 4.39 वाजता (2 जून)

अमावस्या समाप्त: 3.31 वाजता (3 जून)

जाणून घ्या या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी काय सावधानी बाळगायला पाहिजे.

मेष: पैसे गुंतवणूक करणे टाळा आणि ड्रायव्हिंगपासून सावधगिरी बाळगा. यादिवशी तिळाचे तेल आणि मीठ दान करा.

वृषभ: शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहील. गुळ आणि चण्याचे दान करा.

मिथुन: सामान्य दिवस राहील. भगवान शिवाची आराधना करा आणि गरजूंना कपडे दान करा.

कर्क: व्यवसाय वाढीची स्थिती आहे. वादविवाद मिटतील. गोसेवा फळदायी ठरेल.

सिंह: वादविवादांपासून दूर राहा. पक्ष्यांना अन्न आणि पाणी पाजा.

कन्या: कोणतेही नवे काम सुरु करू नका. तांदळाचे दान करा.

तुळ: व्यवसायाची हाताळणी व्यवस्थित करा. गरजवंतांना अन्न व फळांचे दान करा.

वृश्चिक: व्यवसायात जपून पावले टाका. समाजात वावरताना काळजी घ्या.

धनु: व्यवसायात, नोकरीत प्रगती होण्याची शक्यता. असहाय लोकांना मदत करा.

मकर: शनिची साडेसाती असल्याने सर्वच बाबतील पावले जपून टाका.  पशु पक्ष्यांना अन्न पाण्याचे दान करा.

कुंभः प्रतिभा चांगली राहील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. फळ आणि मिठाईंचे दान करा.

मीन: व्यवसायात यश आणि कार्यक्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. फळाचे दान करा.