Why Some Married Couples Stop Having Sex: लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी सेक्स करायचे का थांबवतात?
प्रतीकात्मक फोटो (File Image)

जेव्हा नातेसंबंध सुरू होतात, लग्न एकदम नवीन असते, तेव्हा आपल्याला आपल्या पार्टनर च्या शरीराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्साह असतो तेव्हा शारीरिक संबंध करताना वेगवेगळे प्रयोग ही केले जातात मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर,बरेच जोडपी सेक्सचे प्रमाण कमी करतात आणि अनेक वेळा सेक्स होत ही नाही.तुमच्या आयुष्यात ही तुम्ही हाच अनुभव घेत आहात का? किंवा तुम्हाला असे काही जोडपी माहित आहेत का ज्यांच्यासोबत हे घडत आहे? आज आपण अस होण्याची काही कारण जाणून घेणार आहोत.

नित्यक्रम: बरेच लोक दिनक्रमाचा तिरस्कार करतात. आयुष्य दैनंदिन कामासारखे बनते आणि लैंगिक संबंध त्यापैकी एक आहे. जर डिनर आणि दात घासणे हे एक नित्यक्रम बनले असेल, तर हे ही असे काहीतरी आहे जे तुम्हाला करायचे आहे किंवा करणे अपेक्षित आहे.

रसहीन : या प्रकरणात जर उत्साह निघून गेला असेल, वासना कमी झाली असेल तर फोरप्ले किंवा मोहात पडण्याची इच्छा निघून जाते. अशा परिस्थितीत, जोडप्याने सेक्समधील रस गमावलेला असतो.

मुले आणि पालक: बर्याचदा जेव्हा घरात मुले आणि पालक असतात तेव्हा सेक्सची इच्छा संपते. प्रायवसीच्या समस्येमुळे हे घडते. मात्र आपण आपल्या इच्छेला मारू नये, अशा वेळी सुट्टीची योजना करावी.

गर्भनिरोधक गोळ्या: जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर तुमची सेक्स ड्राइव्ह मरते. तुमची कामवासना मंदावते आणि निराशा वाढते. असे असेल तर समाधानासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

असुरक्षितता: लग्नानंतर अनेक जोडपी जिममध्ये जाऊन फिट राहण्याचा प्रयत्न करतात. ते शरीरात होणाऱ्या बदलांची असुरक्षित असतात. तुमचे शरीर बदलेल हे अगदी स्वाभाविक आहे, मात्र हे तुम्हाला स्वीकारावे लागेल.

टीप- या लेखात दिलेल्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती माहितीच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. हे कोणत्याही रोगाच्या उपचार किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी बदलले जाऊ नये आणि लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी होतील असा आमचा दावा नाही, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या