Uncle Aunty Kiss Video: अस्सल प्रेम कधीच संपत नाही! काकींनी घेतले काकांचे चुंबन, कोण लाजले? पाहा व्हिडिओ
Uncle Aunty Kiss | (Photo-Instagram)

सोशल मीडियावर एका काका आणि काकींचा किसींग व्हिडिओ (Uncle Aunty Kissing Video) जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते खरे प्रेम कधीच कमी होत नाही. वाढत्या वयाप्रमाणे वाढतच जाते. जणू 'प्यार कभी भी मरता नही.. मौत से भी डरता नही' या शोले चित्रपटातील गाजलेल्या गाण्याप्रमाणेच. प्रेम हे एक असा धागा आहे जो एकमेकांना घट्ट बांधून ठेवतो. जगाच्या काणाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असा. तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या सोबतच असतो. प्रेम कधी वय, वजन, उंची, जात, धर्म पाहात नाही. पूर्वी प्रेम म्हटलं की फक्त स्त्री आणि पुरुष अशीच प्रतिमा समोर यायची. काळासोबत आता ही कवाडेही बदलली आहे. आता प्रेमातील लिंगनिरपेक्षताही संपत चालली आहे. इथे दिलेल्या व्हायरल व्हिडिओतही   या काका-काकींचे (Uncle Aunty Viral Video: ) प्रेम पाहून वाढत्या वयासोबत प्रेम वाढतच जाते याची खात्री पटू शकते.

सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, एक काकी एका काकांचे हळुवार चुंबन (Uncle Aunty Kiss) घेते. हे कपल बहुता नवरा बायको असावेत. काकींनी चुंबन घेताचत काका लाजून चूर होऊन जातात. काकींनी किस करताच काका एकदम मान खाली घेतात आणि डोळे झादुसरीकडे फिरवतात. काकीही मग हळूच दुसरीकडे पाहू लागतात. एखाद्या चित्रपटातही पहायला मिळणार नाही असे सुंदर दृश्य या व्हिडिओत पाहायला मिळते. जे अस्सल आहे. (हेही वाचा, Bodybuilder Yuri Tolochko: आगोदर Sex Doll सोबत विवाह, आता Ashtray च्या प्रेमात; कझाकिस्तानी बॉडिबील्ड यूरी तोलोचको पुन्हा चर्चेत)

इन्टाग्राम व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by @kethamma__avva

इंस्टाग्रामवर kethamma__avva नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 60 लाख वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तो शेअर केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. एका युजर्सने लिहिले आहे 'खरे प्रेम कधी कमी होत नाही'. दुसरा युजर्स म्हणतो 'प्रेमाला वयाचे बंधन नसते.'