Sex Tips: सेक्सदरम्यान परमोच्च सुखासाठी व्हायब्रेटरचा वापर?; पुरुषांना वाटू शकते कमतरतेची भीती; जाणून घ्या कशी हाताळाल परिस्थिती
Smart sex toy, Lioness vibrator. (Photo Credits: YouTube Grab)

काही स्त्रिया आपल्या जोडीदारासह लैंगिक संबंध (Sex) ठेवताना, स्वतःला परमोच्च आनंद मिळवण्यासाठी व्हायब्रेटर (Vibrator) वापरणे पसंत करतात. याबाबत रेडिटवर एका वापरकर्त्याने असा एक प्रश्न उपस्थित केला होता की, 'महिला जेव्हा लैंगिक संबंधात व्हायब्रेटर वापरतात, तेव्हा पुरुषांना आपल्यामध्ये काहीतरी कमी असल्याची भावना निर्माण होऊ शकते का?' जे लोक खरे आणि प्रामाणिक असतील ते या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे देतील. जर स्त्रिया पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवताना व्हायब्रेटर वापरत असतील, तर पुरुषांचा अहंकार आणि सेक्स करण्याची इच्छा दोघांनाही ठेस पोहचेल.

महिला जोडीदाराचे असे वागणे नेहमी त्याला, ‘आपण आपल्या पार्टनरला आनंद देऊ शकत नाही’ या गोष्टीची आठवण करून देत राहिल. त्यामुळे काही लोकांना आपल्या महिला जोडीदाराचे व्हायब्रेटरचे वापरणे थोडे अवघडल्यासारखे वाटू शकते.

आजकाल आपण सर्व गोष्टींबद्दल व्यावहारिक होत चाललो आहोत. मात्र कदाचित तुम्ही या गोष्टीकडे दुसऱ्या नजरेने पाहू शकता. याबाबत पुरुषाने असा विचार केला पाहिजे की, त्याची महिला जोडीदार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. महिला जेव्हा व्हायब्रेटर वापरण्याची कल्पना मांडते, तेव्ह ती त्याबद्दल अस्थिर असते. मात्र जेव्हा पुरुष जोडीदार या गोष्टीसाठी तयार होतो तेव्हा एक नव्या प्रकारच्या थ्रीसमचा अनुभव ते दोघेही घेऊ शकतात. त्यामुळे काही प्रमाणात पुरुषानेही या गोष्टीसाठी तयार होण्यास हरकत नाही. (हेही वाचा: सेक्सदरम्यान चुकुनही करू नका लाळ, व्हॅसलीन, नारळ तेल किंवा लोशनचा वापर; जाणून घ्या होणारे दुष्परिणाम)

मात्र सेक्स करताना प्रत्येक वेळी व्हायब्रेटरचा वापर केल्याने, तुमच्या नात्यावर कदाचित वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्या पुरुष जोडीदाराच्या स्वाभिमानाला इतकी मोठी ठेस पोहचू शकते, की त्यामुळे कदाचित त्याची नात्यातील इच्छाही मरू शकते. म्हणूनच, आपण जे करण्याची योजना आखत आहात त्याबद्दल आधी जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. तसेच अनेकवेळा पुरुष पार्टनर सुरुवातीला या गोष्टीसाठी तयार होतात, मात्र जेव्हा सेक्स सुरु होतो तेव्हा त्यांना त्या कृतीतून बाहेर फेकले गेल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे महिला जोडीदाराने सेक्स मध्ये पुरुष जोडीदारही योग्य प्रकारे सामील होईल याची काळजी घ्यावी.

(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)