प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

Sex हा अनुभव प्रत्येकासाठी खूप खास आणि वेगळा असतो. मग तो अनुभव तुमच्या वैवाहिक आयुष्यात असो किंवा तुमच्या प्रियकरासोबतचा असो. हा अनुभव खूप स्पेशल असावा आणि खूप काळ राहावा असे ब-याच लोकांना वाटत असते. मात्र कधी कधी रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे ब-याच लोकांना आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा अनुभव हवा तसा एन्जॉय करता येत नाही. जेव्हा आपण जोडीदारासोबत तो क्षण अनुभव असतो तेव्हा तो किंवा ती आपल्याशी एकरुप व्हावा अशी प्रत्येक जोडीदाराची अपेक्षा असते. मात्र दिवसभराच्या आलेल्या थकव्यामुळे ती गोष्ट घडत नाही.

अशा वेळी पुढे दिलेल्या '5' गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला तुमचे सेक्स लाईफचा सर्वोच्च आनंद घेता येईल. शिवाय या गोष्टींमुळे तुमचा सेक्स स्टेमिना वाढविण्यासही मदत होऊ शकते.

1. हस्तमैथुन:(Masturbation)

सेक्स ला घेऊन आपल्यामध्ये असलेले टेन्शन दूर करण्यासाठी हस्तमैथुन करणे फायद्याचे ठरेल. हस्तमैथुनाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही तुमचा सेक्शुअल स्टेमिना वाढवू शकता. महिलांनी आपला सेक्शुअल स्टेमिना वाढविण्यासाठी सेक्स टॉयचा वापर करु शकतात.

2. व्यायाम:

आपल्या ओटी-पोटीच्या भागात आणि पोटाचे काही व्यायाम प्रकार करुन तुम्ही तुमचा सेक्शुअल स्टेमिना वाढवू शकता. नियमित अशा पद्धतीचे व्यायाम प्रकार केल्यास तुमची सेक्स लाईफ सुद्धा चांगली राहते. Anal Sex पहिल्यांदा करत असाल तर घ्या या '5' गोष्टींची काळजी

3. नैसर्गिक वनस्पती:

सेक्शुअल स्टेमिना वाढविण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक औषधी वनस्पतींचा देखील वापर करु शकता. आयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा उपयोग सेक्स लाईफ वाढविण्यासाठी केला जातो.

4. फोरप्ले

जास्त वेळ बेड वरती सेक्सचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला फोरप्ले करणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिक रित्या सेक्ससाठी तयार होता, ज्यामुळे तुमचे सेक्स क्रिया जास्त काळ सुरु राहू शकते.

5. ल्यूब्रिकेशन

महिलांना जास्त काळ सेक्स लाईफ एन्जॉय करायची असेल तर त्यांनी आपल्या गुप्तांगावर ल्यूब्रिकेशन असणे गरजेचे आहे. यामुळे सेक्स दरम्यान होणारा त्रास कमी होतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकाळ सेक्सचा अनुभव घेऊ शकता. त्याशिवाय तुम्ही ओरल सेक्स आणि फोरप्ले ने सुद्धा गुप्तांगामध्ये ल्यूब्रिकेशन चांगले होते.

या गोष्टींनी तुम्ही तुमची सेक्स लाईफ थोडी सोपी बनवून त्याचा दीर्घकाळ अनुभव घेऊ शकता. तसेच तुमचा सेक्शुअल स्टेमिना वाढविण्यासाठी या गोष्टी कामी येऊ शकतील.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)