अनेकदा जोडप्यांमध्ये सेक्सचा (Sex) आनंद नीट न घेता येण्यामागचे कारण महिला जोडीदार असते. अनेकदा पुरुष आपली वासना पूर्ण करण्यासाठी महिला जोडीदाराची मनाची तयारी नसतानाही तिच्यासोबत संभोग करतात. मात्र यात ना महिलेला आनंद मिळतो ना पुरुषाला. त्यामुळे महिलांचा मूड लक्षात घेऊन वा त्यांचा मूड बनवून त्यांच्याशी संभोग करा. असे केल्यास तुमचा सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त अशा आणखी ब-याच गोष्टी आहेत ज्या सेक्स दरम्यान प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवल्या तर सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकून ठेवता येतो.
अनेकदा महिलांनाही आपल्या पुरुष जोडीदारासोबत सेक्स करण्याची इच्छा असते मात्र सेक्स दरम्यान त्याच्या काही गोष्टी आवडत नसल्या कारणाने त्या टाळाटाळ करतात किंवा कधी कधी काही गोष्टींची त्यांना भीती असते त्यामुळेही त्या सेक्ससाठी तयार होत नाही. म्हणून सेक्स दरम्यान पुरुषांनी खालील गोष्टींचा नक्कीच विचार केला पाहिजे.
1. महिलांना आवडणारी सेक्स पोजिशन ओळखा: जर तुम्हाला तुमच्या महिला जोडीदारास तुमची कोणती सेक्स पोजिशन्स आवडते हे जर तुम्हाला कळले तर तुम्हाला सेक्सचा आनंद द्विगुणित करता येईल. Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा
2. नग्न स्थितीत असताना महिलेला तिच्या शरीरावरून हिणवू नका: अनेकदा पुरुषांना महिलेच्या शरीरावरून हिणवायची सवय असते. ज्यामुळे महिलांना पुरुष जोडीदारामोर नग्न होण्यास भीती वाटते. मात्र जर तुम्ही तिला हिणवणे बंद केले तर तिचीही खात्री पटेल की आपल्या जोडीदार आपल्यावर खूप प्रेम करतो आणि ती स्वत: सेक्ससाठी तयार होईल.
3. सेक्सदरम्यान नवनवीन गोष्टी ट्राय करा: दरम्यान महिलांना काही सेक्सी व्हिडिओ, फोटोज, चित्रपट दाखवा. तसेच तुमच्या शरीराबाबत तुमच्या महिला जोडीदाराला आवडणा-या भागाचे प्रदर्शन करा. ज्यामुळे ती उत्तेजित होईल. आणि तुम्हाला दीर्घकाळ सेक्सचा अनुभव घेता येईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्सदरम्यान वा सेक्सपूर्वी तुमच्या महिला जोडीदाराला प्रेमाने स्पर्श करून, मिठीत घेऊन, चुंबन देऊन तिला आपलेसे करा. जेणे करुन समोरचा व्यक्ती हा आपल्याशी केवळ वासनेसाठी नाही तर प्रेमासाठी हे सर्व करतोय याची तिला खात्री पटेल.