Sex Survey: लैंगिक संबध ठेवण्यापेक्षा Netflix पाहण्यात युवकांना अधिक रस, सर्वेक्षणातून खुलासा
Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जोडप्यांना, खास करुन युवक युवतींना लैंगिक संबंध (Sex Relation) ठेवण्यात अधिक रस असतो असे विविध सर्वेंमधून अनेकदा पुढे आले आहे. मात्र, अलिकडेच एका नव्या सर्वेत एक भलताच खुलासा झाला आहे. तरुण जोडपी सेक्स (Sex ) करण्यापेक्षा नेटफ्लिक्स (Netflix) पाहण्यात अधिक प्राधान्य देतात किंबहून त्यांना त्यात अधिक रस असल्याचे पुढे आले आहे. सर्वेतील खुलासा पाहून अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका नव्या सेक्स सर्वेमध्ये ही बाब पुढे आली आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या सेक्स सर्वेमध्ये तरुणांना, काही जोडप्यांना सेक्स, सेक्स लाईफ, सेक्सची गरज आणि सेक्समध्ये असलेली आवड आणि मनोरंजनासोबतच इतर काही गोष्टींबाब प्रश्न विचारण्यात आले. या वेळी प्रश्नांच्या उत्तरातून पुढे आलेले सत्य काही वेगळेच होते. सर्वेतून पुढे आलेली माहिती अशी की, साधारण 10 तरुणांमागे एक तरुण हा सेक्स पेक्षा नेटफ्लिक्स पाहण्याला प्राधान्यक्रम देतो. ही सर्व तरुणाई साधार 22 ते 38 वर्षे वयोगटातील होती. यात तरुण आणि तरुणी आदींचा समावेश होता. (हेही वाचा, Netflix, Amazon Prime Video, Hotstar या OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाईन न्यूज पोर्टल वर आता केंद्रीय प्रसारण खात्याची असणार करडी नजर)

युवकांनी सांगितले की, ते नेटफ्लिकसचे फ्री सब्सक्रिप्शन कधी येते याची वाटच पाहात असतात. तसेच, प्रति महिना विशिष्ठ रक्कम भरण्यासही ते तयार आहेत. त्यासाठी काही काळ वाट पाहण्याचीही त्यांची तयारी असते. इतकेच नव्हे तर सर्वेत सहभागी झालेल्या जवळपास 15% लोकांनी सांगितले की, नेटफ्लिक्ससाठी ते आपला सोशल मीडियाही सोडायला तयार आहेत. द सन आणि न्यूजट्री सारख्या वेबसाईट्सनी या सर्वेबाबत वृत्त दिले आहे.

रेग्युलेटर Ofcom ने म्हटले की, या सर्वेमध्ये असेही पुढे आले की, काही युवक असेही आहेत जे दिवसातील 40% वेळ हा टीव्ही आणि ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यात खर्च करतात. सेविंग्ज वेबसाईट VoucherCodes ने 2,200 लोकांना प्रश्नविचारले. या प्रश्नांमध्ये ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्विसबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले होते.