Saliva as Lube: ...म्हणून सेक्सदरम्यान पॉर्न स्टार्सप्रमाणे थुंकीचा वापर करणे टाळा; नाहीतर Private Part बनेल अनेक आजारांचे घर
Should you use spit as lube? (Photo Credits: The Noun Project and File Image)

शारीरिक संबंध अथवा सेक्स (Sex) दरम्यान, अतिशय उपयोगी असूनही ल्युब्रिकेशनला (Lubrication) हवे तितके महत्व दिले जात नाही. ल्युब्रिकेशन हे एक प्रकारचे तेल किंवा ग्लिसरीन-आधारित द्रावण असते जे, घर्षण कमी करण्यासाठी वापरले जाते. सेक्स करताना निर्माण होणाऱ्या वेदनाही यामुळे काही प्रमाणात कमी करत येऊ शकतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारची ल्युब्रिकेशन्स उपलब्ध असूनही अनेक लोक नारळ तेल किंवा तत्सम नैसर्गिक गोष्टींचा वापर करतात. तसेच असेही काही लोक आहेत जे XXX व्हिडीओ किंवा पॉर्न फिल्ममधून धडा घेतात आणि ल्युब्रिकेशन म्हणून चक्क आपल्या थुंकीचा (Saliva) वापर करतात. मात्र असे करणे कदाचित तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

थुंकीमुळे लैंगिक संसर्गाचा धोका असू शकतो, त्यामुळे संभोग करताना घर्षण कमी करण्याचा विचार करत असाल तर नेहमी एक चांगले ल्युब्रिकेशनच वापरा. यामुळे अनेक आजारही दूर राहू शकतात तसेच सेक्समध्येही एक प्रकरचा स्मूथनेस प्राप्त होईल.

ल्युब्रिकेशन म्हणून थुंकी वापरल्याचे दुष्परिणाम - 

  • लाळेद्वारे एसटीआयसारखे अनेक संसर्ग पसरू शकतात  

घसा किंवा तोंडातील कोणत्याही प्रकारची एसटीआय (STI) लाळेद्वारे जननेंद्रियामध्ये प्रसारित करणे खूप सोपे आहे. नागीण किंवा तत्सम संसर्गजण्य आजार झालेल्या व्यक्तीच्या लाळेतून विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे जननेंद्रियाला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. फक्त संसर्गजण्य आजारच नव्हे तर, इतर प्रकारचे एसटीआय, जसे की गोनोरिया, क्लॅमिडीया, एचपीव्ही, सिफलिस आणि ट्रायकोमोनिआसिस देखील लाळेद्वारे जननेंद्रियांमध्ये संक्रमित होऊ शकतात. (हेही वाचा: Sex मध्ये पुरुषांना परमोच्च आनंद कशाने मिळतो? जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी स्त्रियांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या)

  • योनीला संसर्ग होण्याची शक्यता

लाळेची रचना योनिमार्गाच्या द्रवापेक्षा भिन्न आहे. लाळ पाचन एंझाइम्स आहे जे अन्न बारीक करण्यास मदत करते. योनिमार्गावर त्याचा संक्षारक परिणाम होऊ शकतो. तोंडात असलेले जीवाणू योनिमार्गापेक्षा मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत, सेक्सदरम्यान त्यांचा योनीशी संपर्क आल्यास ते योनीमार्गाचा पीएच बिघडवू शकतात. तसेच यामुळे पुढे योनीचे नैसर्गिक मायक्रोबायोम देखील विस्कळीत होऊ शकते. या सर्वांमुळे योनीला यीस्टचा संसर्ग किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

तर अशा या महत्वाच्या कारणामुळे सेक्सदरम्यान थुंकीचा वापर करणे टाळा. Play Safe, Stay Safe या उक्तीप्रमाणे व्यवस्थित सेक्स करा आणि सुरक्षित राहा.