....म्हणून मुलींना लग्नाचा पश्चात्ताप होतो !
उदास, नाराज मुलगी (Photo Credit : Pixabay)

लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या वळणावर महिलांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. नव्याची नवलाई संपली की मी नव्या आयुष्यात अडजस्ट होण्याचा संघर्ष सुरु होतो. लग्नानंतर मुलीचे फक्त घर नाही तर संपूर्ण आयुष्य बदलून जाते. अनेकदा तर उगाच लग्न केले, असे वाटते. पण मुलींच्या मनात असे विचार का डोकावतात? तुम्हालाही असे वाटते का? तुमच्या डोक्यातील विचारामागे आहेत ही कारणे...

स्वतःसाठी वेळ न देता येणे

लग्नानंतर संसार, घर, करिअर ही कसरत कोणालाच चुकत नाही. या सगळ्यातून स्वतःसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे त्रासल्या गेलेल्या मुलींच्या मनात असे विचार येऊ लागतात.

पर्सनल स्पेस

पर्सनल स्पेस ही प्रत्येकाला आयुष्यात हवीहवीशी वाटते. पण लग्नानंतर आयुष्यातून गायब झालेल्या या स्पेसमागे मुली धावत राहतात. पण ती मिळत नसल्याने मुलींची चिडचिड होते आणि त्यांना लग्नापूर्वीचे दिवस आवडू लागतात.

एक्ससोबत होणारी तुलना

खरंतर आपल्या साथीदाराची एक्ससोबत तुलना करणे चुकीचे आहे. त्यामुळे अनेकदा वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. एक्स गर्लफ्रेंडसोबत सततच्या तुलनेमुळे मुली दुखावतात व त्यांना लग्नाचा निर्णय चुकीचा वाटू लागतो.

स्वतःला बदलणे

लग्नानंतर मुलींना अनेक बाबतीत तडजोड करावी लागते. परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो. याचा मुलींना भयंकर त्रास होतो.

बाळासाठी घाई

लग्नानंतर बाळाचा कळत-नकळत दबाव मुलींवर येतो. बाळाच्या याबद्दलच्या अनेक प्रश्नांना मुलींना सामोरे जावे लागते. बाळासाठी सारखा मागे तगादा लावल्यास त्यांना लग्नाचा निर्णय योग्य नसल्यासारखे वाटू लागते.