इंटरनेट, सोशल मीडियामुळे अलीकडे पॉर्न (Porn) किंवा सेमी पॉर्न (Semi Porn) बघणे हे काही नवं राहिलेलं नाही. अनेकजण अजूनही आपण पॉर्न बघतो या गोष्टीला मान्य करत नाहीत ही गोष्ट वेगळी पण मागील काही वर्षात पॉर्न साइट्सच्या व्ह्यूज आकडेवारीनुसार, सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारताचे नावही टॉप मध्ये आहे. आणि खरं सांगायचं तर पॉर्न पाहण्यामध्ये काही गैरही नाही (वयाच्या पात्रतेनुसार). अनेकांनी शेअर केलेल्या अनुभवानुसार, पॉर्न मुळे सेक्स पोझिशन (Sex Positions) पासून ते ऑर्गजम (Orgasm) पर्यंत अनेक गोष्टींमध्ये सुधारणा देखील होत असतात. पण याच अनुभवांची दुसरी बाजू अशीही आहे ज्यात, अनेकांनी आपल्या खऱ्या आयुष्यातील सेक्सशी पॉर्न मध्ये दाखवण्यात येणाऱ्या सेक्स सोबत तुलना केल्याने त्यांना कित्येकदा हताश व्हावे लागले आहे. Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत
साहजिकच, पॉर्नस्टार्सची जीवनशैली, शरीराचा आकार, वजन, पद्धती यामध्ये आणि एका सामान्य व्यक्ती मध्ये फरक असल्याने सेक्स करताना सुद्धा फरक पडणारच. आज आपण असेच काही फरक जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही चुकूनही पॉर्न आणि खऱ्या आयुष्यातील सेक्स मध्ये का तुलना जर नये हे स्पष्ट होईल.
-पॉर्न स्टारच्या कंबरेचे माप हे सामान्य महिलेच्या कंबरेच्या तुलनते 10% लहान असते, ज्यामुळे पॉर्नस्टार प्रमाणे अनेक पोझिशन्स करताना सामान्य स्त्रीला अडचण येऊ शकते.
- पॉर्न मध्ये फोरप्ले शिवाय अनेकदा थेट पेनिट्रेशन सुरु केलेले तुम्ही पहिले असेल, पण खऱ्या आयुष्यात फोरप्ले शिवाय शरीर तयारही होत नाही.
- अनेकदा पॉर्न व्हिडीओज मध्ये दाखवल्या जाणाऱ्या पोझिशन्स या कॅमेरा अँगलची कमाल असतात, प्रत्येकवेळेस तो/ ती पॉर्न स्टार त्याच पोझिशन मध्ये असेल असे गरजेचे नाही.
- खऱ्या आयुष्यात सेक्स करताना घाम, चिकट अंग यामुळे अनेकदा किळस वाटू शकते, पण पॉर्न मध्ये हेच सर्व स्टार्स एन्जॉय करताना दिसतात (अनेकदा हा घाम नसून तेलही असू शकते)
- केवळ पेनिट्रेशन मुळे स्त्रिया परमोच्च क्षण अनुभवू शकतात हे मानणे फार गैर आहे, ती एक प्रोसेस असून पॉर्न स्टार्सच्या बाबतही सारखीच असते, मात्र ती दाखवली जात नाही.
- लिंगाचा आकार आणि स्टॅमिना हा सामान्य पुरुषाच्या तुलनेत पॉर्न व्हिडीओज मध्ये नेहमीच अधिक दाखवला जातो, साधारण व्यक्तीचा आकार ही असाच असेल ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.
-Pubic Hair ही कॉमन गोष्ट आहे मात्र पॉर्न स्टारच्या बाबतीत ती अनेकदा पाहायला मिळत नाही.
- पॉर्न पाहून Anal सेक्स करण्याचा विचार करत असाल तर जरा विचार करा, यामध्ये विष्ठेपासून ते असहनीय वेदनेपर्यंत सर्व काही समाविष्ट असते.
दरम्यान, सेक्स ही एक शारीरिक गरजेइतकीच भावनिक गोष्ट आहे, मात्र पॉर्न मध्ये हा एक व्यवसाय आहे हे समजून घ्या. खऱ्या आयुष्यात तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी पॉर्न पाहणे यात काहीच हरकत नाही मात्र त्याची स्वतःच्या सेक्स लाइफशी तुलना करणे या मध्ये बऱ्याच समस्या येऊ शकतात.