पावसाळा हा असा ऋतू आहे, ज्यात प्रत्येकाच्या प्रेमाशी संबंधित काही ना काही आठवणी असतात. पावसाचे गार-गार थेंब अंगावर झेलताना ब-याचदा आपल्याला आपल्या जोडीदाराची आठवण येते. अशावेळी आपला जोडीदार आपल्या सोबत असावा, त्याच्या सोबत आपण काही गुलाबी क्षण घालावावे असे वाटते. पावसाळ्यात जोडप्यांना सर्वात जास्त इच्छा होते ती सेक्स करण्याची. कारण ते वातावरणच तसे असते की, अनेकांना मोह आवरत नाही. पावसाळ्यात आपल्या जोडीदारासह सेक्स (Monsoon Sex) करण्याचा अनुभवच काही और असतो. पावसात भिजल्यानंतर आपल्या जोडीदारासह सेक्स करण्याची मजा काही वेगळीच असते.
कामाच्या गडबडीत जे कपल्स एकमेकांच्या जास्त जवळ येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी पावसाळा हा उत्तम ऋतू आहे. म्हणूनच आम्ही अशा काही सेक्स आयडियाज सांगणार आहोत, ज्याचा विचार करायला काही हरकत नाही.
1. लाँग ड्राईव्ह ला घेऊन जा:
काही वेळासाठी आपली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या जोडीदारासह लाँग ड्राईव्ह ला जा आणि त्या दरम्यान तुम्ही थोडे सेक्सी किंवा रोमँटिक व्हायला हरकत नाही. जर या लाँग ड्राईव्ह दरम्यान पाऊस पडत असेल तर गाडी मध्ये थांबवून सेक्स लाईफ एन्जॉय करु शकता. पावसातील आल्हाददायक गारवा आणि पावसाचे तुषार अंगावर शहारा आणतात. ज्यामुळे आपण आपल्या जोडीदाराशी आणखी जवळीक साधतो.
2. घराच्या छतावर किंवा गच्चीवर रोमांस:
पावसाळ्यात जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला ओल्या अंगाने किंवा मोकळ्या केसांमध्ये पाहिले तर तुम्ही स्वत:ला तिच्या जवळ जाण्यापासून रोखू शकणार नाही. जर तुम्हाला लाँग ड्राईव्हला जाणे शक्य नसेल, तर जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा घराच्या छतावरील किंवा गच्चीवरील जागेवर जाऊ शकता. कारणात पावसात भिजून सेक्स करण्याचा अनुभव खूपच रोमांचित असतो असं म्हणतात.
हेही वाचा- Sex Life झाले कंटाळवाणे ? ट्राय करा Wild आणि Kinky Sex; जोडीदाराला खुश करत कामजीवनात भरा नवे रंग
3. कार सेक्स:
अनेक बॉलिवूड चित्रपटांत नायक-नायिका कारमध्ये रोमांन्स करताना दिसतात. त्यामुळे की काय आजकाल कारमध्ये सेक्स करणे हा जणू ट्रेंडच बनत चाललाय. कारमध्ये सेक्स करणे हे खूपच हॉट आणि वाइल्ड गोष्ट मानली जाते. मात्र कारमध्ये सेक्स करण्याची मजा द्विगुणित तेव्हाच होते जेव्हा धो-धो पाऊस पडत असेल. अशा वेळी तुमच्या कारला एखाद्या निर्मनुष्य स्थळी घेऊन जा आणि सेक्सचा चा आनंद लुटा.
4. तंबूतील सेक्स:
पावसाळ्यात जर तुम्ही एक हिल स्टेशनला फिरायला जाणार असाल, तर हिरव्यागार वनराईने नटलेल्या आणि डोंगरद-यांच्या कुशीत जाऊन रोमांस करण्याची मजाच काही और असते. अशाव वेळी मात्र वॉटरप्रूफ तंबू अवश्य घ्या आणि पावसात डोंगरद-या आणि हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यातील चांगली जागा शोधून सेक्स चा आनंद द्विगुणित करा.
थोडक्यात आपल्या जोडीदारासोबत पावसात सेक्स करणे हा एक खूपच रोमांचकारी आणि अद्भूत अनुभव असतो. त्यामुळे तो तितकाच स्पेशल आणि हटके असला पाहिजे.