'क्रश' ला समोर पाहून मुलींकडून नकळत होतातच या  '6' चूका
क्रशला पाहून मुली हमखास चूका करतात (photo Credits : pexels.com )

प्रेम या भावनेमुळे सारं आयुष्य बदलून जातं. पण अनेकदा लोकांना प्रेम, आकर्षण यामधील फरकच समजत नाही. तर काहींना प्रेम ही भावना समजली तरीही प्रेम व्यक्त करता येऊ शकत नसल्याने आयुष्यभर ती एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात 'क्रश' म्हणून राहते. आपाल्या समाजात मुलानेच प्रेमात पुढाकार घेऊन बोलावं असं असा अलिखित नियम आहे. त्यामुळे अनेक मुलींचं प्रेम व्यक्त न झाल्याने ते केवळ त्यांच्यापाशी राहतं. मग मुलींना आवडणारी ती एखादी व्यक्ती समोर आल्यास त्यांच्याकडून नकळत काही चूका होतात. परिणामी त्याचा फटका भविष्यात बसू शकतो.

क्रशला पाहून हमखास मुलींनो या चूका करणं टाळाच

1. स्टॉकिंग

कामाच्या किंवा शाळा, कॉलेजच्या वयात तुम्हांला एखादा मुलगा आवडत असेल तर काही तास तो तुमच्यासमोर असतो. मात्र त्यानंतर त्याला पाहण्यासाठी, तो काय करतोय? याबाबत विचारकरून मुली बैचैन होतात. मग अशावेळेस मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सतत स्टॉकिंग केलं जातं. एका विशिष्ट टप्प्यानंतर स्टॉकिंग करणं चूकीचं आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा.

2.त्यालाच पाहत राहणं

मनातल्या भावना बोलून दाखवता येत नसल्याने तुम्हंला ज्या मुलाबाबत प्रेम किंवा आकर्षण वाटतं त्याला फक्त पाहूनच मुलींना आनंद होतो. तो सतत तुमच्या आजूबाजुला असेल तर ती मुलगी गालातल्या गालातच हसत राहते.

3.उत्साहाच्या भरात चूका होतात

कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हांला आवडणारी व्यक्ती तुमच्या नजरेच्या टप्प्यातच राहील यासाठी तुम्ही नकळत प्रयत्न करत असतात. ती व्यक्ती समोर नसेल किंवा अचानक तुमच्या समोर आल्यास अतिउत्साहाच्या भरात काही चूका होऊ शकतात. परिणामी इतर लोकांसमोर तुमचं इम्प्रेशन चूकीचं पडण्याचा धोका असतो.

4.अस्वस्थ होणं

मुली अनेकदा मुलांसोबत खुल्याने बोलत नाही. त्यातही तुमचं 'क्रश' असणारी व्यक्ती स्वतःहून समोरून बोलायला आल्यास आत्मविश्वास कमकुवत असणार्‍या मुली घाबरतात,नर्व्हस होतात.

5. नजरेला नजर देण्यास घाबरतात

डोळ्यांची भाषा ही अबोल असली तरीही ती अनेकदा मनातल्या सार्‍या भावना मोकळ्यापणाने व्यक्त करते. त्यामुळे अनेकदा मुली आवडती व्यक्ती समोर असेल तर त्याच्यापासून पळ काढते.

6. स्वतःच्या विश्वात रमतात 

अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळणार नाही हे मुलींना ठाऊक असतं. त्यामुळे त्या व्यक्तीसोबत आहोत असं ठरवून त्य दिवा स्वप्न पाहत राहतात, स्वतःच्याच विश्वात रममाण होतात.