एका जर्मन (Germany) महिलेला तिच्या जोडीदाराच्या कंडोमला (Condom) छिद्र पाडल्याबद्दल सहा महिन्यांची तुरुंगवास सुनावण्यात आली आहे. ही महिला तिच्या जोडीदाराचे स्पर्म (Sperm) चोरल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. या महिलेला गर्भवती व्हायचे होते, त्यामुळे तिने परवानगी न घेता तिच्या जोडीदाराच्या कंडोमला सुईने भोसकले. पश्चिम जर्मनीतील एका न्यायालयाने कंडोमशी छेडछाड करणे ही एक प्रकारची चोरी असल्याचे म्हटले आहे. याला स्टील्थिंग (Stealthing) असे म्हटले जाते, ज्यामध्ये एक पार्टनर दुसऱ्याच्या नकळत सेक्स करताना कंडोम काढतो किंवा त्यात छेडछाड करतो.
प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, 39 वर्षीय महिलेचे तिच्या 42 वर्षीय पुरुष मित्रासोबत शारीरिक संबंध होते. कोर्टात त्यांच्या नात्याचे वर्णन 'फ्रेंड्स विथ बेनिफिट' असे करण्यात आले, ज्यामध्ये मित्रांमध्ये शारीरिक संबंध असले तरी त्यांच्यामध्ये प्रेम नसते. 2021 पासून हे दोघे भेटत आहेत. मात्र कालांतराने महिलेचा जीव तिच्या या मित्रावर जडला. या मित्राच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही प्रेमाची भावना नव्हती.
एके दिवशी हे दोघे सेक्ससाठी भेटले. दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या घटनेनंतर, महिलेने तिच्या पार्टनरला मेसेज करून सांगितले की, तिने त्याच्या कंडोमला छिद्र पडले होते व आता ती गर्भवती आहे. ही गोष्ट ऐकून या मित्राच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, ही महिला गर्भधारणा करू शकली नाही. (हेही वाचा: एकावेळी 9 जणींसोबत लग्न केलेल्या Arthur O’Urso ने प्रत्येकीला खूष ठेवण्यासाठी बनवलं होत ‘Sex Rooster’ पण ठरला सपशेल अपयशी!)
परंतु, तो मेसेज वाचून व्यक्तीने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मित्राशी आपल्याला सिरीयस रिलेशन प्रस्थापित करायचे असल्याने आपण हे सर्व केले असल्याचे तिने कबूल केले. या खटल्याचा निकाल देणारे न्यायाधीश अॅस्ट्रिड सेलेव्स्की म्हणाले, ‘आम्ही आज ऐतिहासिक निकाल देत आहोत. कारण सर्वसामान्यपणे पुरुष सेक्स करताना महिलेला न माहिती होता कंडोम काढतो, जे स्टील्थिंग आहे. परंतु या प्रकरणामध्ये उलटे घडले आहे. त्यामुळे कंडोमशी छेडछाड केल्याप्रकरणी आम्ही महिलेला दोषी ठरवत आहोत.