
ब्राझीलच्या एका तरूणाने आपल्या 9 पत्नींना खूश ठेवण्यासाठी सेक्स रोस्टर बनवलं आहे. त्याच्यामते हे रोस्टर पाळणं हे एक थकवणारं काम आहे. मागील वर्षी ब्राझीलचा Arthur O’Urso हा प्रकाशझोतात आला तो एकाच वेळी 9 महिलांशी लग्न केल्याच्या कारणामुळे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, ‘freedom to love’आणि फक्त एकदाच लग्न करण्याच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी त्याने नऊ जणींसोबत लग्न केले. नऊ जणींसोबत संसार सांभाळणं सोप्प काम नसल्याने त्याने प्रत्येकीला खूष ठेवण्यासाठी वेळापत्रक आखलं आहे.
The Sun च्या बातमीनुसार, Arthur ने सेक्सचा आनंद देण्यासाठी देखील वेळापत्रक बनवलं आहे. हे वाचून जितकं सारं सुखकारक आणि स्वप्नवत वाटत असेल तितके हे सोप्पं नाही. हा प्रकार खूप थकवणारा आहे. अनेकदा एकीसोबत प्रत्यक्ष सेक्स करताना डोक्यात विचार दुसरीचेच येतात. त्यामुळे आता आर्थरने हे वेळापत्रक बंद करून टाकलं आहे. अनेकदा आपण सेक्स करत आहोत कारण त्यामधून आपल्याला आनंद मिळतोय यासाठी नाही तर आपलं वेळापत्रक बनवलं गेल आहे यासाठी असे तो म्हणाला आहे.
आपला पती इतरांसोबत सेक्स करतो म्हणून एकमेकींबद्दल त्यांच्या मनात असुया नसते पण कधी कोणाला जास्त महागडं गिफ्ट दिलं तर त्यामुळे इतर बायका हिरमुसतात असे आर्थर सांगतो.
Arthur चा मागील वर्षी सर्वात पहिला विवाह Luana Kazaki सोबत झाला होता. त्यानंतर त्याने अजून 8 जणींसोबत लग्न केल्याने चर्चेमध्ये आला होता. सध्या त्याची एक पत्नी त्याच्यापासून विभक्त होण्याची मागणी करत आहे.