Commercial Sex Worker: कोरोना काळात नोकरी गेली, नवरा झाला Gigolo, बायकोने मागितला घटस्फोट
Gigolo | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि त्याच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आदी कारणांमुळे अनेकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बसले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना नाईलाजाने वेगळा व्यवसाय करावा लागला. लॉकडाऊनचा फटका बसलेल्या बंगळुरु स्थिती एका 27 वर्षीय व्यक्तीला नाईलाजाने पुरुष वेश्या (Gigolo) व्हावे लागले. ज्यामुळे आता त्याचा संसारही मोडण्याच्या स्थितीत आहे. लॉकडाऊन काळात या व्यक्तीची नोकरी गेली. जीवन चरिरार्थासाठी तो जिगोलो (Commercial Sex Worker) झाला. सुरुवातीचे काही काळ सर्व काही ठिक चालले. परंतू, जेंव्हा त्याच्या या धंद्याबद्दल त्याच्या पत्नीला कळले तेव्हा मात्र त्याच्या संसारात भूकंप आला.

घटना आहे बंगळुरु शहरातील. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. कारण काय तर तिचा पती पुरुश वेश्या म्हणून काम करतो. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यापासून सुरु केलेले हे काम त्याने आपल्यापासून लपवून ठेवले, असा पत्नीचा आरोप आहे.

वय वर्षे 27 असलेला हा व्यक्ती सुरुवातीला एका बीपीओ कंपनीत काम करत होता. दरम्यान, लॉकडाऊन काळात त्याची नोकरी गेली. कुटंब चालवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी मग त्याने मेल एस्कॉर्ट होण्याचे ठरवले. तसे कामही सुरु केले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचा प्रेमविवाह आहे. सन 2017 मध्ये बीपीओ ऑफिसच्या उपहारगृहात या दोघांची ओळख झाली. अल्पवधीतच दोघेही एकमेकांना डेट करु लागले. दोन वर्षे एकेमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांचे लग्न झले. दोघांनी बंगळुरु शहरात एक घरही भाड्याने घेतले. दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागला. पतीची नोकरी गेली. त्याने इतर ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू, प्रयत्न करुनही नोकरी न लागल्याने त्याने पुरुष वेश्या होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, थोड्याच दिवसात त्याच्या पत्नीला संशय आला की तिचा पती तिच्यापासून काहीतरी लपवतो आहे. वारंवार फोन आणि लॅपटॉपमध्येच बिझी असतो. त्याला वारंवार फोन कॉल्स आणि मेसेज येतात. त्यानंतर तो घराबाहेर विविध ठिकाणी जातो. त्याने आपला फोन आणि लॅपटॉप आदींना पासवर्ड टाकला आहे. त्यामुळे संशय वाढल्याने पत्नीने आपल्या अभियंता असलेल्या भावाच्या मदतीने लॅपटॉप, मोबाईलचा पासवर्ड मिळवला. लॅपटॉप, मोबाईल उघडल्यावर तिला धक्काच बसला. तिच्या पतीचे काही नग्न आणि इतर महिलांचे अर्धनग्न फोटो तिला पाहायला मिळाले. मग तिने पतीनकडे चौकशी केल्यावर त्याने आपल्या कामाबाबत पत्निला माहिती दिली.

पतीच्या कामाचा खुलास होताच पत्नीने सुरुवातीला पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हे प्रकरण जोडप्याने आपसात मिटवावे असा सल्लादिला. मग या महिलेने महिला मदत कक्षासोबत संपर्क साधला. इथे पतीला समुपदेशनासाठी बोलावले. इथे पतीने आपल्या कामाचा स्वीकार केला. तसेच, आपले आपल्या पतीवर प्रचंड प्रेम आहे. परंतू, या कामात आपल्याला मजा येत असल्याने आणि पैसेही मिळत असल्याने आपण हे का करत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, आता आपण हे काम करणार नसल्याचेही पतीने कबुल केले.