Image For Representation (Photo Credits: Twitter)

महिलांना नेमकं काय हवं असतं? हे समजून घेणं प्रत्यक्ष देवालाही जमणार नाही असं एक सर्वसाधारण मत अनेक मंडळी ठोकून देतात, पण वास्तविक हे समजून घेणं इतकं काही अवघड नाहीये. पण जर का तुम्हाला इतका विचार करायची मेहनत स्किप करायची असेल तर त्यासाठी अगदी सोप्प्या शब्दात समजवून सांगणारा हा टिंडरचा (Tinder) व्हिडीओ मदत करेल. टिंडर या एका डेटिंग ऍप ने नुकताच काही महिला प्रतिनिधींना घेऊन एक व्हिडीओ बनवला आहे, ज्यामध्ये ते महिलांना तुम्हाला नेमकं आयुष्यात काय हवंय इतका सोप्पं आणि सरळ प्रश्न विचारतात,  या वर व्हिडिओतील महिला वेगवेगळी उत्तरे देतात. ही संकल्पना जितकी ऐक्याला सोप्पी वाटतेय तितकीच इंटरेस्टिंग सुद्धा आहे, कारण यात कपडे (Clothes), फॅशन (Fashion), जॉब (Job), बॉयफ्रेंड (Boyfriend), सेक्स लाइफ (Sex Life)  अशा सगळ्या मुख्य विषयांना हात घातला गेलाय. आणि मुळातच व्हिडीओ मधील प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी असल्याने आपल्या आजूबाजूला पाहायला मिळणाऱ्या स्त्रियांशी त्यांना जोडून तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर शोधता येईल.

आता या व्हिडीओ मध्ये नेमकं आहे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर सुरुवातीला यातील अनेक जणी या कामाच्या ठिकाणी समानता हवी असे उत्तर देऊन सुरुवात करतात.त्यानंतर हळूहळू विषय कपड्यांवर येतो, मग जीवनशैलीवर, मग पैसे आणि अंतिमतः सेक्स लाईफ वर सुद्धा यातील अनेकजणी भाष्य करतात. एक छान सेक्स आणि त्यानंतर ऑर्गॅज्म हवा अशीही काही मुलींची मागणी असते. Girls Secret: मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठी 6 सिक्रेट्स, जी त्या कोणालाही सांगत नाहीत; मुलांना तर कधीच नाही

टिंडर व्हिडीओ

आता यापुढे जर का तुम्हाला कोणत्या मुलाने तुमच्याकडे मुलींना समजणे शक्य नाही अशी तक्रार केली तर त्यांना नक्की हा व्हिडीओ दाखवा. अर्थात हे सर्व प्रश्न आणि त्यावरील उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलणारी असू शकतात, पण कमी अधिक प्रमाणात यातील उत्तरे सर्व महिलांच्या बाबत लागू होऊ शकतात.