फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा हा व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) म्हणून साजरा केला जातो. 7-14 फेब्रुवारी या आठवड्याभराच्या सेलिब्रेशनमध्ये तरूणाई प्रत्येक दिवशी विविध पद्धतीने संपूर्ण आठवडा साजरा करतात. प्रामुख्याने तरूण प्रेमी जोडप्यांमध्ये 'व्हेलेंटाईन डे'च्या सेलिब्रेशनची क्रेझ अधिक असते. 11 फेब्रुवारी हा दिवस 'प्रॉमिस डे' (Promise Day 2020 ) म्हणून साजरा केला जातो. 'प्रॉमिस डे' या नावातच या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी प्रेम करणार्या व्यक्ती त्यांच्या साथीदारांना एकमेकांना कायम साथ देण्याची कबुली देतात. तसेच चांगल्या अथवा वाईट काळातही एकमेकांसोबत राहणार, असे प्रेमीयुगुल एकमेकांना वचन देतात.
बहुतेक तरूण या दिवशी आपल्या साथीदाऱ्याला वचन देत प्रेमाची सुरुवात करतात. व्हॅलेंटाईन केवळ प्रेमयुगुलच साजरा करु शकतात, असा गैरसमज आहे. या दिवसात आपण आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाही आकर्षित अशी भेटवस्तू देऊ शकतात. या दिवशी दिलेले वचन आयुष्यभर पाळले जाते, असा अनेकांचा समज आहे. तुम्हांला 'प्रॉमिस डे' ही कल्पना एक दिवस म्हणून पटत नसली तरीही तुमच्या साथीदाराला प्रेमासोबतच नात्याचा विश्वास देणे ही संकल्पना म्हणून याकडे पाहा. कारण रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचे असेल तर त्याचा पाया मजबूत असायला आहे. 'विश्वास' हाच तुमच्या नात्याचा पाया असेल तर तो मजबूत करणेही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे काही खास मेसेज, गिफ्टच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही 'प्रॉमिस डे' खास बनवू शकता. तसेच प्रेमाचा आणि मैत्रीच्या नात्यात आणखी गोडवा आणू शकतात. हे देखील वाचा- Chocolate Day 2020: 'चॉकलेट डे' निमित्त तुमच्या पार्टनरला 'या' रोमँटिक अंदाजात द्या सरप्राईज!
संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असतेजागरण लाइफस्टाईल डेस्कः व्हॅलेंटाईन सप्ताहाचा एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण दिवस म्हणजे प्रॉमिस डे. तो आठवड्याच्या पाचव्या दिवशी पडतो. या दिवशी, जोडपे कायमस्वरुपी नातेसंबंधासाठी एकमेकांना अतूट अभिवचने देतात. याशिवाय काहीही झाले तरीही ते नेहमी एकत्र राहतील आणि एकमेकांशी निष्ठावान राहतील असेही वचन देतात.