![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-4-380x214.jpg)
Rajmata Jijau Punyatithi 2024 HD Images: राजमाता जिजाबाई (Rajmata Jijau) शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी इ.स. 1598 झाला. जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला होता. भारत सरकारने 7 जुलै 1999 रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले होते.
जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता. (हेही वाचा - Shivrajyabhishek Sohala 2024 From Raigad Live Streaming: रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सेलिब्रेशन सुरू; इथे पहा कार्यक्रमाचे थेट प्रदर्शन (Watch Video))
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना
पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-1.jpg)
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-6.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-5.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-4.jpg)
राजमाता जिजाऊसाहेब भोसले
यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा !
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Rajmata-Jijau-Punyatithi-2024-HD-Images-3-1.jpg)
जिजाबाईंना एकूण सहा (6) अपत्ये होती. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. 19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.