Birthday In November (Photo Credits-File Image/Facebook)

कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची खासियत काय आहे हे समजल्यास तो व्यक्ती कोणत्या महिन्यात जन्मला आहे याचा साधारण अंदाज लावला जातो. तर आजपासून सुरु झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींमध्ये सुद्धा काही खासियत असते. त्यानुसार या महिन्यातील व्यक्ती आपल्या स्वत:च्या हिंमतीवर यशस्वी होतातच पण खुप भाग्यशाली सुद्धा असतात असे मानले जाते. या महिन्यात काही महान आणि भाग्यवान व्यक्तींचा सुद्धा जन्म झाला आहे. त्यापैकी विस्टंन चर्चिल, जवाहर लाल नेहरु, विराट कोहली, ऐश्वर्या राय, नीता अंबानी, अमर्त्य सेन हे सुद्धा याच महिन्यात जन्मलेले आहेत.

तर नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची व्यक्तिमत्व कसे असते त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घ्या या महिन्यातील व्यक्तींमध्ये नेमक्या काय खासियत असतात.(#NoShaveNovember: नोव्हेंबर महिन्यात जगभरातील पुरुष का करत नाहीत दाढी? जाणून घ्या 'या' ट्रेंड विषयी)

>>नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली बाळ दुसऱ्यांपेक्षा वेगळीच असतात. त्या व्यक्ती एवढ्या खास असतात की, त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही. अशी लोक काहीतरी हटके पद्धतीचा नेहमी विचार करतात. त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा एक विशिष्ट असून ती सर्वांना प्रभावित करते.

>>या महिन्यातील व्यक्ती घरातील व्यक्ती असो वा मित्र या सगळ्यांसोबत प्रामाणिकपणे वागतात. एवढेच नाही आयुष्यातील पार्टनरला ते कधीच फसवत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू शकता.

>> नोव्हेंबर मधील व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाची फार कौतुक केले जाते. लोक त्यांची उपस्थितीमुळे अधिक महत्वाची मानतात. त्यामुळे काही जण अशा व्यक्तींच्या विरोधात कटकारस्थान करतात.

>>ऐवढेच नाही तर व्यक्ती वेळेवर काम पूर्ण करतात. त्याचसोबत एक गोष्ट करायची ठरवल्यास ती पूर्ण करण्यासाठी 200 टक्के मेहनत करतात. नोव्हेंबर मधील व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमान असतात.

>> या महिन्यातील व्यक्ती आपल्या गुपित गोष्टी दुसऱ्याला कळू नये याची फार काळजी घेतात. तसेच स्वत: काही गोष्टी गुपित ठेवतात मात्र तुमच्यासाठी ते नेहमीच उभे राहतात.

>> नोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींना राग खुप येतोच त्याचसोबत त्यांचा मुड स्विंग होण्याचे प्रमाण फार दिसून येते. त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीने आयुष्य जगणे पसंद करतात.

एवढेच नाही तर नोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींमध्ये एक वेगळेच वैशिष्ट दिसून येते. तसेच या व्यक्ती दुसऱ्यांच्या विचाराचा आदर करतात. मात्र काही गोष्टी चुकीच्या होत असल्यास त्यांना त्या पटत नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींबाबत काही चुकीच्या गोष्टी बऱ्याच वेळा बोलल्या जातात. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींना त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण होतात.