
Nag Panchami Images and Wallpapers in Marathi: मुसळधार पावसासह श्रावणाचे आगमन झाले आहे. श्रावणातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी हा सण साजरा केला जातो. यावर्षी श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने आजच्या दिवसाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची, वारुळाची पूजा करतात आणि त्याला दुधाचा, लाह्याचा नैवेद्य दाखवतात.
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते. तर असा हा खास नागपंचमीचा दिवस, व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा. (हेही वाचा: Nag Panchami 2019: ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी; जाणून घ्या काय आहे नागपंचमी व्रताची पौराणिक कथा)

नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या शुभेच्छा
महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा या गावात जिवंत नागांची पूजा पूजा केली जाते, त्यांची मिरवणूक काढली जाते. मार्लेश्वरच्या शिवमंदिरातही जिवंत नाग आढळत असल्याने तिथे त्यांची पूजा होते. मात्र आजच्या दिवशी नागांची पूजा करताना त्यांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या.