
Nag Panchami 2019 Wishes and Funny Status: आज सर्वत्र नागपंचमीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याची पूजा करण्याची पध्द्त रूढ झाली. मात्र सापासारखी वैशिष्ठ्ये असणारे लोक आपल्या आजूबाजूला नेहमी पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात ‘सापासारखा फणा काढणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. काल बिग बॉस मराठीमध्ये बोलता बोलला अलका कुबल सहज म्हणाल्या की, बाप्पा अजूनही कधी कधी त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतो. यावरूनच फणा काढून समोरच्यावर हल्ला करणे यात त्या किती तरबेज असाव्यात ते दिसते.
तर आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला नागपंचमीबाबत काही हटके विनोद सांगणार आहोत. यामागे कोणाचेही मन, भावना दुखावण्याचा हेतू नाही. खास लोकांना पाठवा खास HD Greetings, Images, Wishes आणि Jokes आणि साजरा करा आजचा नागपंचमीचा सण
बायकोच्या नुसत्या आवाजावर डुलणाऱ्या सर्व "नागोबांना"
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा!

तुमच्या पानचट कार्यकमास माझ दुर्लक्ष हेच सगळ्यात मोठ उत्तर,
विनाकारण डसणाऱ्या सोशल मीडियावरील नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!

बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय
गण्या- अरे तो चावत नाही, त्याच विष संपलय म्हणून तो रिचार्ज करायला आलाय

माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा!

तर अशा प्रकारे सापांच्या वैशिष्ठ्यांवर अनेक विनोद तयार होत असतीलही, मात्र साप हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे. आज ठिकठिकाणी जिवंत नागाची पूजा केली जाईल यावेळी त्याला प्रसाद म्हणून दुध पाजण्याची प्रथा आहे. मात्र ती पूर्णतः चुकीची आहे. उलट दुधामुळे सापांना त्रासाच होतो. तर अशा काही गोष्टी लक्षात घेऊनच आजचा सण साजरा करा.