अनहेल्दी फूड (Photo Credits: Wikimedia Commons)

आजकालच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेकदा खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी-वेळा यामुळे गंभीर आजारांना नकळत आमंत्रण दिले जाते. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोनची समस्या ही त्यापैकीच एक. किडनी स्टोनची समस्या टाळायची असल्यास या ६ पदार्थांचे सेवन टाळणे योग्य ठरेल. कोणते आहेत ते पदार्थ, जाणून घेऊया...

शिमला मिरची

शिमला मिरचीत ऑक्सलेटचे क्रिस्ट्ल्स असतात. हे ऑक्सलेट क्रिस्ट्ल्स कॅल्शियमला मिळून त्यांचे कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्ट्ल्स तयार होतात. याला किडनी स्टोन असे म्हणतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळायची असल्यास शिमला मिरचीचे सेवन टाळा.

टॉमेटो

टॉमेटोच्या बियांमध्ये देखील ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बिया काढूनच टॉमेटोचा वापर करणे उपयुक्त ठरेल.

चॉकलेट

किडनी स्टोनची समस्या असल्यास किंवा पोटाचे इतर विकार असल्यास ऑक्सलेटयुक्त चॉकलेटचे सेवन कमी करावे.

चहा

चहाचे अति सेवन करणाऱ्यांना किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी चहाचे व्यसन सोडलेलेच बरे.

सीफूड्स

सीफूड्समधून मोठ्या प्रमाणात प्यरिन्स मिळतं. यामुळे शरीरात युरीक अॅसिडचे प्रमाण वाढते. परिणामी युरीक अॅसिड स्टोन होण्याची शक्यताही वाढते.

नमकीन पदार्थ

नमकीन पदार्थही किडनी स्टोनच्या समस्येला आमंत्रण देतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळायची असल्यास नमकीन पदार्थांचे सेवन कमी करा.