Shri Siddhivinayak Live Aarti & Darshan: राज्यासह मुंबईतसुद्धा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचसोबत नागरिकांना सुद्धा नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर बगिचे, गार्डन, बीच, मंदिरे यांना सुद्धा राज्य सरकारने निर्बंध लागू केले असून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आता पुन्हा एकदा भाविकांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांना थेट मंदिरात प्रवेश मिळणार नसून त्यांना वर्च्युअली दर्शन आणि आरतीची सोय करुन देण्यात येणार असल्याचे मंदिर विश्वस्तांकडून सांगण्यात आले आहे.
भाविकांना जरी आता दर्शन किंवा आरतीसाठी मंदिरात येण्यास परवानगी नसणार आहे. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला श्री सिद्धिविनायक मंदिराच्या फेसबुक पेज किंवा YouTube च्या माध्यमातून तुम्ही गणपतीचे दर्शनासह लाईव्ह आरती पाहू शकता.(संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आंब्यांची भेट)
दरम्यान, याआधी सुद्धा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी ही भाविकांना वेबच्या माध्यमातून दर्शनासह आरतीची सोय करण्यात आली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती जशी हळूहळू सुधारु लागली असता मंदिरे कोरोनाच्या नियमांचे पालन करत पुन्हा सुरु करण्यात आली. फक्त 50 टक्के भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याची सोय करावे अशा सुचना सुद्धा मंदिर प्रशासनांना दिल्या गेल्या होत्या. मात्र सध्या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता श्री सिद्धिविनायक मंदिराकडून हा निर्णय घेण्यात आला असावा.