Monsoon Care : पावसात भिजल्यावर या गोष्टी करा, जाणून घ्या

देशात मान्सूनने आगमन लवकरच होणार आहे. अशा परिस्थितीत अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलंही खेळताना दिसत आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कारण, सर्वात जास्त संसर्गजन्य आजाराचे प्रमाण पावसाळ्यामध्ये होते. पावसाळा हा अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्ही कधी पावसात भिजत असाल तर काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.

पावसात भिजल्यानंतर करा या 5 गोष्टी

कपडे बदला 

भिजल्यावर लगेच कपडे बदलणे. यामुळे तुम्ही फंगल इन्फेक्शन टाळाल.

आल्याचा चहा किंवा काढा

पावसात भिजल्यानंतर गरम हळदीचे दूध किंवा आल्याचा चहा, कॉफी प्यावा. ताप आणि सर्दी टाळण्यासाठी गरम खावे किंवा प्यावे.

पाय कोरडे करा

पाय स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. त्यानंतर पाय स्वच्छ आणि कोरडे करा. यामुळे तुम्हाला   फंगल इन्फेक्शन होणार नाही.

क्रिम लावा

पावसात भिजल्यावर अँटीबॅक्टेरियल क्रीम जरूर वापरा. यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात. बॅक्टेरियाल समस्या होणार नाही.