सेक्समध्ये पुरुषांच्याही असतात अपेक्षा; महिलांना आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी माहित असायला हव्या या गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सेक्स (Sex) हे एक Give and Take  नाते असते. एका चांगल्या सेक्समध्ये जोडीदारांपैकी दोघांनाही परमोच्च आनंदाची अनुभूती (Orgasam) मिळणे अतिशय आवश्यक असते. बरेचवेळा स्त्री पुरुष आपल्याला सेक्समध्ये काय हवे आहे या गोष्टी डिस्कस करतात. मात्र अनेकवेळा पुरुष याबाबत स्त्रियांशी बोलताना लाजेखातर आपल्या सर्व अपेक्षा अथवा इच्छा बोलून दाखवत नाहीत. अशावेळी त्यांना नक्क्की कसे खुश करायचे हा स्त्रियांच्या समोर मोठे प्रश्न असतो. त्यामुळे आज आम्ही सेक्समधील पुरुषांच्या अपेक्षा तुम्हाला सांगणार आहोत.

  • सेक्स थेरपिस्ट आणि डॉक्टर लॉरा बर्मन यांच्या मते, प्रत्येक पुरुषाला स्त्री सोबत स्वतःच्या परमोच्च सुखाची अपेक्षा असते. पुरुषांना त्यांच्या स्त्री पार्टनरने नवनवीन गोष्टी ट्राय करणे आवडते. त्यामुळे महिला स्वतः नवीन सेक्स पोझिशन्स ट्राय करण्यासाठी पुरुषांना उद्यपित करू शकतात. तसेच रोमँटिक जागी सेक्स करण्याचा आग्रह धरू शकतात किंवा सेक्सी कपड्यांद्वारे पुरुषांना रिझवू शकतात.
  • तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवा पण सेक्स टॉईज स्त्री पुरुषांमधील सेक्स रोमांचक आणि उत्तेजित बनवतो. पुरुषांना आपल्या जोडीदाराशी सेक्स टॉईजशी खेळणे आवडते.
  • आपणाला जर पॉर्न पाहण्याची आवड असेल तर ही गोष्ट आपल्या जोडीदाराला आवर्जून सांगा. सेक्स रिसर्चर अँड रिलेशनशिप एक्सपर्ट सारा हंटर मूरे यांच्यामते. काही लोक पॉर्नबाबतील असहम असतात. मात्र आपण जर याबाबत मोकळेपणाने संवाद साधला तर पॉर्न हा तुमच्या सेक्सला अतिशय आनंददायी बनवू शकतो. (हेही वाचा: बोअरिंग झालेल्या Sex Life ला असे बनवा रंगतदार; Kink, Sex Toys चाही होईल फायदा)
  • सेक्समध्ये फक्त स्त्रीलाच स्पर्श सुख हवे असते असे नाही, पुरुषांनाही उत्तेजक स्पर्श आवडतात. त्यांनाही आपल्या ‘त्या’ जागांवर स्पर्श केलेले आवडते.
  • काहीवेळा पुरुषांना स्वतः पुढाकार घेणारी स्त्री आवडते. त्यामुळे पुरुषाने आपल्या जवळ यावे अशी अपेक्षा ठेवण्या ऐवजी कधी कधी तुम्ही पुरुषांना उतेजीत करा. यासाठी ओरल सेक्स हा सर्वोत्तम उपाय आहे. पुरुषांना ओरल सेक्स प्रचंड आवडतो.