सध्या फॅशन, स्टाईल यांची व्याख्या पूर्णतः बदलली आहे. त्यात स्त्रियांसोबत पुरुषांच्या लाइफस्टाइलचे मार्केटदेखील प्रचंड वाढले आहे. आजकाल ‘दाढी’ हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे की, त्यासाठी वेगवेगळी उत्पादने बाजारात आली आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येक पुरुष दाढी वाढवण्याच्या मार्गावर आहे, मात्र याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, पुरुषांच्या दाढीमध्ये कुत्र्यांच्या केसांमध्ये आढळतात त्याहूनही अधिक आणि घातक बॅक्टेरिया असतात. द सन वेबसाइटने याबाबत वृत्त दिले आहे.
सध्या लांब दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे, यासाठी दाढी वाढवणे सोपे आहे मात्र ती मेंटेन करणे अवघड आहे. यासाठी बीअर्ड वॉश, दाढीसाठी वेगळे तेल, वेगळे कलर अशा अनेक गोष्टींवर पैसा खर्च करायला लागतो. मात्र हीच दाढी आरोग्यासाठी इतकी घटक ठरू शकते याचा कोणी विचारही केला नसेल. कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या रोगांचा मनुष्याला कोणता धोका नाही ना? यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. (हेही वाचा: प्रत्येक भारतीय पुरुषाने ट्राय केलेच पाहिजेत दाढीचे हे प्रकार)
यामध्ये 18 दाढीवाले पुरुष आणि 30 कुत्रे सहभागी झाले होते. यापैकी 23 कुत्र्यांपेक्षा पुरुषांच्या दाढीमध्ये जास्त बॅक्टेरिया आढळले आहेत. तर 7 पुरुषांच्या दाढीमध्ये घातक जीवाणू आढळले आहेत, ज्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. याद्वारे असा निष्कर्ष निघत आहे की, दाढीवाल्या पुरुषांपेक्षा कुत्रे अधिक स्वच्छ असतात.