Men’s Lifestyle मध्ये त्वचेची काळजी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मॉर्निंग रुटीन, फेसवॉश, फेसपॅक अशा गोष्टींनी आपण त्वचेची काळजी घेऊ शकतो. त्यांनतर शरीराचा सर्वात महत्वाचा घटक, जो पहिल्याच भेटीत नजरेत भरतो तो म्हणजे तुमची दाढी. आजकाल 10 पैकी 8 पुरुष दाढीत असलेले दिसतात. आजूबाजूच्या लोकांवर छाप पाडण्यासाठी दाढीचा खुबीने उपयोग केला जात असलेला दिसतो. गेल्या दोन वर्षांपासून ‘बिअर्ड इज न्यू हॉट’ म्हणजे दाढी असलेले पुरुष ही हॉटपणाची नवी व्याख्या आहे असे मानले जाऊ लागले आणि त्यामुळेच अनेक दाढीच्या स्टाइल्स बाजारात आल्या. दाढीचे नवनवीन ट्रेंड्सदेखील येत आहेत, आणि ते फॉलो देखील केले जातात. दाढी मिशीच्या स्टाइलचे अनेक प्रकार आहेत. पण काही विशिष्ट प्रकार भारतीय पुरूषांमध्ये लोकप्रिय असलेले दिसतात. (हेही वाचा : Men’s Lifestyle : चेहऱ्याचा उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय)
> स्टबल (गालांवर किंचित वाढलेली दाढी): हा दाढी प्रकार अगदी प्रत्येक पुरूषालाच शोभून दिसतो. गालावर बारीक आणि पातळ केस असलेली दाढी एकदम पुरूषी आणि नीटनेटका असे दोन्हीही लूक देते. यामध्ये पुरुष एकदम रांगडाही वाटत नाही आणि एकदम शार्पही वाटत नाही.
> वॅन डायक: अँथनी वॅन डायक या प्रसिद्ध चित्रकाराच्या लुकवरून ही स्टाईल तयार झाली. या प्रकारात मिशा आणि दाढीचा भाग वेगवेगळा केलेला असतो. मिशा संपतात, तिथे शेवटी आणि हनुवटीवरील छोटी टोकदार दाढी वरच्या दिशेने पीळ देऊ शकतात. या लुकमध्ये नियमित देखभाल कमी प्रमाणात ठेवली तरी चालते, परंतु आपल्याला रोज सकाळी ही स्टाइल करावी लागते.
> इम्पिरीयल: या प्रकारात दाधीपेक्षा मिशीला जास्त महत्व दिले जाते. अगदी तुळतुळीत दाढी आणि त्यावर भरगच्च मिशा हे मर्द असल्याचे लक्षण मानले जाते. बाजीराब मस्तानी मधील बाजीराव आठवा.
> चीन स्ट्रिप: वर बारीक मिशी असलेली किंवा नसलेली, खालच्या ओठाखाली केस ठेवून ते हुनवटीर्पयत नीटनेटके वाढवून ही चीन स्ट्रिप स्टाइल केली जाते. ज्या पुरूषांना आपला नीटनेटका लूक आवडतो तेच पुरूष अशी दाढी ठेवण्याचं धाडस करतात. ही दाढी बारीक आणि रेखीव असली तरच छान दिसते. (हेही वाचा : Men’s Lifestyle : तुम्हालाही हवी आहे Clean आणि Clear त्वचा? सर्वात आधी बदला ‘ही’ गोष्ट)
> फुल बियर्ड: सध्या चालत असलेल्या प्रकारामधील हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला दाढी वाढवण्याशिवाय काही करायचे नसते. महिन्यात दोन वेळा फक्त दाढीला शेप द्या आणि स्वच्छतेची नियमित काळजी घ्या, हेच या प्रकारची दाढी राखण्याचे सूत्र आहे. मिडिया इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक या दाढीला प्राधान्य देतात.
> बॅनडोल्ज: ‘एरिक बॅनडोल्ज’ नावाच्या तरुणावरून या स्टाईलला बॅनडोल्ज नाव देण्यात आलं आहे. या प्रकारात अगदी गळ्यापर्यंत दाढी वाढवली जाते. मात्र ही दाढी ज्या लोकांचा चेहरा पसरट आणि मोठा आहे त्यांनाच सूट करते.
हे झाले प्रकाराबद्दल मात्र दाढी राखणे हे काही खायचे काम नाही. दाढी ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. योग्य ती देखभाल, स्वच्छता आणि उत्तम ग्रुमिंग करावे लागते. त्यासाठी बाजारात अनेक प्रकारची तेलं, जेल, वेगवेगळी ट्रिमर उपलब्ध आहेत. तुम्हाची त्वचा आणि दाढीची पद्धत यावरून तुम्ही ही उत्पादने निवडू शकता.
प्रतिक्रिया