भारत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे बाहेर येणे जाणे बरेच कमी झाले आहे. म्हणूनच ऑनलाइन डेटिंग अॅप्सची (Online Dating App) सध्या चलती आहे. सामाजिक अंतरामुळे लोक एकमेकांना भेटू शकत नाहीत, मात्र ते इतरांना ऑनलाईन भेटण्यासाठी अशा प्रकारच्या अॅपची मदत घेत आहेत. मात्र काही लोक अजूनही शारीरिकदृष्ट्या एकमेकांना भेटत आहे. सध्याच्या काळात अॅपद्वारे लोकांना भेटताना समोरची व्यक्ती सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे, म्हणूनच डेटिंग अॅप्सनी आता ‘कोरोना विषाणू लस’ हा एक निकष त्यामध्ये समाविष्ट केला आहे.
टिंडर, बंबल, ओके क्यूपिड इत्यादी लोकप्रिय डेटिंग अॅप्सच्या आकडेवारीनुसार असे अॅप्स वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'एलेट डेट' (Elate Date) नावाच्या अॅपने निकष म्हणून 'लस स्टेटस’ जोडले आहे, जेणेकरून त्या आधारावर लोक फिल्टर करता येतील. एलेट डेटचे संस्थापक संजय पांचाळ म्हणतात की, आपण लसीकरणासाठी थोडा लवचिक बनत आहोत. आमच्या संशोधनात आढळले आहे की, 60% पेक्षा जास्त लोक लसीकरणाविरूद्ध असलेल्या व्यक्तीस डेटिंग करण्याचा विचार करत नाहीत. (हेही वाचा: मानेवरीत किस करून जोडीदाराला करा सेक्ससाठी उत्तेजित; फॉलो करा या टिप्स)
अनेक लोक आपल्या फिल्टरमध्ये लस घेतलेल्या व्यक्तीला प्राधान्य देत आहेत, त्यामूळे, समोरच्या व्यक्तीशी मॅच होण्यासाठी लोक त्यांच्या अॅप बायोसमध्ये 'लसीकरण', 'शॉट्स' इत्यादी शब्द जोडू लागले आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना ही लस घ्यायची नाही, अशा लोकांना याच मार्गाने लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. OK Cupid अॅपचे प्रवक्ते मायकेल केई म्हणाले की, अलिकडच्या काळात डेटिंग अॅपवर लसीकरणाबद्दल माहिती देणे हा फार मोठा ट्रेंड झाला आहे. त्यांच्या मते, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना अधिक पसंती मिळत आहेत.