Kissing Tips to Turn Her on for Sex: मानेवरीत किस करून जोडीदाराला करा सेक्ससाठी उत्तेजित; फॉलो करा या टिप्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

किसिंग (Kissing), चुंबन हे जवळजवळ प्रत्येक रोमँटिक नात्याचा आत्मा असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा आणखी एक प्रकार आहे. नात्यांमध्ये दोन व्यक्ती जवळ येण्यासाठी किसिंग फार महत्वाचे आहे. कदाचित यामुळे नाते पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगात असे भिन्न प्रकारचे किस आहेत, ज्यांचे विभिन्न अर्थ निघतात. तुमच्या सेक्स लाईफमधील मजा परत आणण्यासाठीही किसिंग फायद्याचे ठरू शकते. ओठांनी शरीराच्या विविध भागांवर घेतलेले चुंबन नक्कीच तुमच्या जोडीदाराला उत्तेजित करू शकते. सर्व चुंबनांपैकी, मानेजवळील चुंबन सर्वात जास्त उत्कट आहे. जोडीदाराच्या मनात कामवासना निर्माण करण्यासाठी हे चुंबन फायद्याचे ठरू शकते.

यासह, जोडीदाराबाबतचा आदर दर्शवणे, प्रेम व्यक्त करणे याचा एक मार्ग म्हणजे मानेवरील चुंबन. मानेवरील चुंबन आपल्या जोडीदाराचा मूड तत्काळ बदलेल. या लेखात आम्ही अशाच काही किसिंग टिप्स सांगणार आहोत.

स्मूथ अप्रोच- जर आपण आपल्या महिला जोडीदाराला किस करत आहत व ती आपले ओठ दूर करत असेल तर, अशावेळी ताबडतोब तिच्या मानेवर उडी मारणे चुकीचे ठरेल. जोडीदाराचा मूड बनवण्याची क्रिया हळुवार असावी. प्रथम तिच्या गालांवर चुंबन घ्या, नंतर हळुवारपणे कपाळ, हनुवटी, डोळे अशा चेहऱ्याच्या इतर भागांवर चुंबन घ्या. त्यानंतर हळू हळू तिच्या मानेकडे जा. त्यानंतर तिच्या पुढच्या हालचाली ध्यानात घेऊन तुम्ही हळुवार पावले टाका. जर ती तुम्हाला प्रतिसाद देत असेल तर तिच्या मानेवर तुमचे ओठ फिरवत राहा, ज्यामुळे ती या किसिंगचा पुरेपूर आनंद घेऊ शकेल.

सर्वात संवेदनशील भागावर किस करा- एखाद्या स्त्रीच्या मानेवरील सर्वात संवेदनशील भाग तो असतो जो मानेला खांद्याशी जोडतो. परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा संवेदनशील भाग शोधून काढावा लागेल. स्त्रीला उत्तेजित करण्यासाठी तिच्या संवेदनशील भागावर चुंबन घेणे महत्वाचे आहे. अशा भागाला ओठांनी किस करण्यासोबतच जिभेने तो भाग लिक करणेही फायद्याचे ठरेल. (हेही वाचा: Sex Tips: आपल्या पतीला सेक्ससाठी रिझविण्यासाठी महिलांनी ट्राय कराव्या 'या' थ्रिलींग गोष्टी, संभोगादरम्यान मिळेल 'Oh Yes' चा अनुभव)

हळू हळू वेट किस करा- मुलींच्या गळ्यावर चुंबन घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. फक्त एकाच पद्धतीने किस करण्याऐवजी आपण भिन्न पद्धती वापरुन पाहू शकता. सुरुवातीला, आपण त्यांच्या गळ्यावर हळू हळू चुंबन घ्या. त्यानंतर थोडा आवेग वाढवून तुम्ही वेट किस करू शकता. तुमचे हे किसिंग अतिशय स्मूथ असु द्या, कोणतीही घाई करू नका. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचा जोडीदार उत्तेजित होत आहे, त्यावेळी तुम्ही किस आणि लिक करण्याचा वेग वाढवा. त्यानंतर तुम्ही मानेसोबत त्याच्या आजूबाजूच्या भागावरही किस करू शकता.

(नोट- वरील दिलेली माहिती ही फक्त प्राप्त झालेल्या गोष्टींच्या संदर्भातून दिली गेली आहे. त्यामुळे सुचनात्मक उद्देशाने हा लेख लिहिला असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)